
भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane). नेतृत्वात मेलबोर्न कसोटीत (Melbourne Test) विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला कारण आदल्याच सामन्यात हाच भारतीय संघ फक्त 36 धावात बाद झाला होता (Lowest Test Scores) आणि आपल्याला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पुढच्याच सामन्यात भारतीय संघ असा उलटफेर करेल असे कुणालाच वाटले नव्हते. काही जणांनी तर भारतीय संघ चारही सामने गमावेल असे भाकित वर्तवले होते. ते चांगलेच तोंडघशी पडले.
अगदी कमी धावसंख्येत बाद होण्याचा मोठा परिणाम संघाच्या मानसिकतेवर होत असतो. निराशा येत असते आणि त्यातुन सावरण्यास वेळ लागत असतो. यामुळेच कितीतरी संघांनी अगदी कमी धावसंख्येत बाद झाल्यावर पुढचे सामनेसुध्दा गमावले आहेत.
कसोटी सामन्यांचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत 21 सामन्यात 23 वेळा संघ 50 पेक्षा कमी धावांत बाद झाले आहेत आणि त्यापैकी 12 वेळा संघानी त्याच्या पुढचा सामना गमावला आहे तर भारताप्रमाणे पुढचा सामना जिंकणारे संघ फक्त 6 संघ आहेत.
आदल्या सामन्यात अगदी कमी धावसंख्येत बाद झाल्यावर पुढचाच सामना जिंकल्याची ही 6 उदाहरणे पुढीलप्रमाणे.. (कंसात आदल्या सामन्यातील धावसंख्या)
2020- मेलबोर्न- वि. ऑस्ट्रेलिया –
भारत 8 गड्यांनी विजयी (36)
2011- जोहान्सबर्ग- वि. दक्षिण आफ्रिका-
आॕस्ट्रेलिया 2 गड्यांनी विजयी (47)
1994- ब्रिजटाउन- वि. वेस्ट इंडिज-
इंग्लंड 208 धावांनी विजयी (46)
1932- ख्राईस्टचर्च – वि. न्यूझीलंड-
दक्षिण आफ्रिका एक डाव 12 धावांनी विजयी (36 व 45)
1888- लाॕर्डस् – वि. इंग्लंड-
आॕस्ट्रेलिया 61 धावांनी विजयी (42)
1887- सिडनी – वि. ऑस्ट्रेलिया-
इंग्लंड 71 धावांनी विजयी (45)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला