जेव्हा करीनामुळे करिश्मा कपूर झाली होती ट्रोल

Kareena Kapoor & Karishma Kapoor

बॉलीवूड मध्ये जर कुठल्या दोन बहिणींनी नाव गाजवले असेल तर, त्यात करिश्मा कपूर आणि करीना कपूरचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. परंतु याचा अर्थ असा नाही की यापूर्वी दोन बहिणींनी बॉलीवूड गाजवले नव्हते. नूतन आणि तनुजा या दोघींनी स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले होते. त्यानंतर करिश्मा आणि करीनाने बॉलिवूडमध्ये यश मिळवले आहे. करिश्माच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात करीना कपूर ने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आज करीना कपूर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असली तरी पूर्वी ती नव्हती. तेव्हा करिश्मा कपूर मात्र सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह होती. त्याच दरम्यान करीनामुळे करिश्मा चांगलीच ट्रोल झाली होती. स्वतः करिश्माने एका मुलाखतीत ही गोष्ट करीना सोबत शेअर केली आहे.

करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्माचे (Karishma Kapoor) बॉण्डिंग खूप चांगले आहे. या दोघी एकमेकीच्या चांगल्या मैत्रिणीही आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर या दोघी एकमेकींचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असतात. असाच त्यांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झालेला आहे. हा व्हिडीओ एका जुन्या मुलाखतीचा असून करीना आणि करिश्मा यात एकमेकीबाबत बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओत करिश्मा कपूर करीनाला सांगताना दिसत आहे की करीनाच्या पाऊट मुळे ती कशी ट्रोल झाली होती. यावर करीनानेही करिश्माला चांगलेच उत्तर दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

या गप्पांमध्ये करीना कपूर ने करिश्माला विचारले की, सोशल मीडियावर बहुतेक सगळे ट्रोल होतात. मी सोशल मीडियावर नसतानाही ट्रोल झाली आहे. परंतु तू कशामुळे ट्रोल झाली होतीस?

यावर उत्तर देताना करिश्मा कपूरने म्हटले, खरे सांगायचे तर तुझ्यामुळेच मी ट्रोल झाले होते. तेव्हा करिश्माचे हे उत्तर एकूण करीना चकित झाली. माझ्यामुळे ट्रोल कशी झाली असा प्रश्न करीनाने केला असता करिश्माने सांगितले, तुझ्या एका फोटोमुळे मी ट्रोल झाले होते. एका सेल्फी मध्ये तू पाऊट केला होतास. लोकांना तो पाऊट बिलकुल आवडला नव्हता आणि त्यांनी, मला सांगितले की, तुझ्या बहिणीला सांग, असा मोठा पाऊट करू नकोस.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER