
करीना कपूरने (Kareena Kapoor) सैफसोबत (Saif Ali Khan) लग्न करण्यापूर्वी तिचे शाहीद कपूरसोबत (Shahid Kapoor) रिलेशन होते. परंतु नंतर या दोघांमध्ये ब्रेकअप झाला. त्यानंतर करीना आणि सैफ जवळ आले आणि त्यांनी लग्नही केले. परंतु करीनाने या दोघांव्यतिरिक्त आणखी एका मुलावर प्रेम करीत होती आणि त्याच्याबरोबर पळूनही गेली होती. आम्ही हे ऐकीव माहितीवर तुम्हाला सांगत नाही तर स्वतः करीनानेच एका मुलाखतीत याचे रहस्योद्घाटन केले आहे. करीनाच्या या पळून जाण्याच्या प्रकरणामुळेच तिची बोर्डिंग स्कूलमध्ये रवानगी करण्यात आल्याचेही करीनाने सांगितले.
प्रख्यात अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांच्या करिश्मा आणि करीना या दोन मुली. मात्र गेल्या 35 वर्षांपासून रणधीर कपूर आणि बबिता वेगळे राहात आहेत. अर्थात दोघांनी अजून घटस्फोट घेतलेला नाही. बबिताने एकटीने करिश्मा आणि करीनाचा सांभाळ केला आहे. करीना लहानपणापासूनच व्रात्य होती. ती सतत काही ना काही खोड्या काढत असे. आईला ती प्रचंड त्रास देत असे. त्यामुळेच बबिताने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले होते. आपल्या लहाऩपणाच्या प्रेम प्रकरणाची आठवण सांगताना करीनाने सांगितले, माझी आई सिंगल मदर होती आणि आमच्या सर्व गोष्टी तिलाच कराव्या लागत असत. मी मात्र तिला सतत त्रास देत असे. मी 14-15 वर्षांची असेन. एक मुलगा मला खूप आवडायचा. त्या मुलाला भेटण्याची संधी मी शोधत असे. परंतु माझ्या आईला ही गोष्ट आवडत नव्हती. त्यामुळे ती मला त्याला भेटू देत नसे. त्या मुलापासून मला दूर ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी करीनाला बोलता येऊ नये म्हणून बबीता करीनाचा फोन कपाटात लॉक करून ठेवत असे.
एक दिवस आईने माझा मोबाईल तिच्या रुममधील कपाटात ठेवला आणि रूमला लॉक करून ती डिनरसाठी बाहर गेली. मला माझ्या त्या मित्राला भेटायचेच होते. त्यामुळे मी चाकूने आईची रूम उघडली. कपाट उघडले. माझा फोन घेतला आणि माझ्या मित्राला फोन केला. त्याला भेटले आणि मी त्याच्याबरोबर पळून गेले. मात्र आईला हे कळले आणि नंतर हे सर्व प्रकरण समाप्त झाले आणि मी पुन्हा डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये गेले असेही करीनाने या मुलाखतीत सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला