जेव्हा जया बच्चनच्या उद्गारांवर ऐश्वर्याच्या डोळ्यात आले होते पाणी

Aishwarya Rai Bachchan - Jaya Bachchan

सगळ्यात सुंदर नायिका म्हणून ऐश्वर्या रायकडे (Aishwarya Rai) पाहिले जाते. विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगातही ऐश्वर्या बच्चनचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर आहेत. याच ऐश्वर्याने बच्चन कुटुंबियांची सून बनण्याचा निर्णय घेतला. सून बनली आणि आता एका सुनेचे कर्तव्य ती पार पाडत आहे. अमिताभ आणि जया ऐश्वर्यावर खूपच प्रेम करताना दिसतात.

आज याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, ऐश्वर्या आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा एक जुना व्हीडियो व्हायरल झाला आहे. हा व्हीडियो एका चित्रपट पुरस्कार सोहोळ्याचा असून तो अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नापूर्वीचा आहे. या व्हीडियोत जया बच्चन बोलताना दिसत आहेत. जया बच्चन म्हणतात, मी एका अत्यंत सुंदर अशा मुलीची सासू बनणार आहे. ती अशी मुलगी आहे जिच्यावर संपूर्ण देश गर्व करतो. तिचे हास्य हेच तिचे सगळ्यात मोठे सौंदर्य आहे. तुझे आमच्या कुटुंबात स्वागत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. जया बच्चन यांचे हे उद्गार ऐकून ऐश्वर्या भावुक होते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येताना दिसतात.

आणखी एका मुलाखतीतही जया बच्चन यांनी ऐश्वर्याची खूपच प्रशंसा केली होती. मुलाखतकर्त्याने जया बच्चन यांना, ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून बनणे हा योग्य निर्णय वाटतो का? असा प्रश्न विचारला. तेव्हा जया बच्चन यांनी लगेचच हा असे उत्तर देऊन म्हटले होते, माझ्या माहितीप्रमाणे ती खूप चांगली आहे. आणि ती स्वतःच एक मोठी व्यक्ती आहे. तिला कोणाच्या नावाची गरज आहे असे वाटत नाही. घरात ती सुनेची कर्तव्ये योग्यरित्या पार पाडत आहे. तिने स्वतःला या नव्या रुपात पूर्णपणे बदलवून घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER