जेव्हा जावेद अख्तर यांना वयाने १० वर्ष लहान असलेली शबाना आजमी बरोबर झाले प्रेम, अश्या प्रकारे झाली पहिली भेट

Javed Akhtar - Shabana Azmi

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी झाला होता. यावर्षी जावेद अख्तर आपला ७६ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. जावेद अख्तर यांचा जन्म ग्वालियरमध्ये झाला होता. त्यांचे वडील प्रसिद्ध कवी जान निसार अख्तर आणि आई सफिया अख्तर होते. जावेद अख्तर हे बर्‍याचदा हेडलाईन्सचा एक भाग असतात. आपल्या वक्तव्यांमुळे ते बर्‍याचदा चर्चेत राहिले आहे. जावेद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांची प्रेमकथा आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्याशी त्यांची झालेली पहिली भेट बद्दल जाणून घेऊ …

जावेद अख्तर यांनी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीशी लग्न केले आहे. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. जावेद अख्तर शबानाला त्यांच्या वडिलांच्या घरी भेटले. जावेद अनेकदा कैफी आझमी यांना कवितांसाठी भेटायला जात असे. अशा प्रकारे हळू हळू दोघे एकमेकांशी बोलू लागले. ही गोष्ट प्रेमात कधी बदलली हे कोणालाही कळले नाही.

शबानाची आई कैफी आझमींची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलीचे विवाह विवाहित पुरुषाशी व्हावे. पण शबाना जावेदच्या प्रेमात पडली होती आणि तिने आई आणि वडिलांकडे विनवणी केली. त्यानंतर १९७८ मध्ये जावेदने आपली पहिली पत्नी हनी इराणीशी घटस्फोट घेतला. इकडे, हनीला हे समजताच की तिचा नवरा आता तिच्यावर प्रेम करीत नाही, हनीने जावेद यांना शबाना जवळ जाण्यास सांगितले.

एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल बोलताना हनी इराणी म्हणाली की पत्ते खेळताना जावेद हरत होता. मी जावेदला म्हणाले, मी तुमच्यासाठी एक कार्ड काढते. मग जावेद म्हणाले जर कार्ड चांगले निघाले तर मी तुझ्याशी लग्न करीन. यानंतर जावेद अख्तरने वयाच्या २७ व्या वर्षी हनी इराणीशी लग्न केले.

हनीशी घटस्फोट घेतल्यानंतर जावेद आणि शबाना यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या रिलेशनला नाव दिले आणि १९८४ मध्ये दोघांनी मुस्लिम रीति-रिवाजांनी लग्न केले. मात्र, या लग्नापासून शबानाला मुले नाहीत. जावेद अख्तर यांना १९९९ मध्ये पद्मश्री, २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय जावेद अख्तर यांना ८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER