एवढा पाऊस पडल्यावर जगातील कोणतेही शहर तुंबणारच; मनपा आयुक्तांचा दावा

Iqbal Chahal-BMC mumbai Rain

मुंबई : मुंबईत काल (बुधवारी) चार तासांत विक्रमी ३०० मि. मी. पाऊस झाला. अनेक भागांत पाणी साचले, झाडे पडली. पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यासाठी प्रशासनावर टीका झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल (Iqbal Chahal) म्हणालेत – एवढा पाऊस (Rain) पडल्यावर मुंबई काय, जगातील कोणतेही शहर तुंबणारच. मुंबईत सतत दोन दिवस मुसळधार पाऊस बरसला.

हवामान खात्याने बुधवारसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला होता. पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळ भिंत खचली. ५० वृक्ष उन्मळून पडले. स्थितीची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त या भागात आले होते. यावेळी ते म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत मी असा पाऊस पाहिला नाही. एवढा पाऊस झाल्यानंतर मुंबईच काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच. काल मुंबईतील काही भागांत जोरदार वादळ आले होते.  तासी १०१ किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसरात विक्रमी पाऊस झाला. २६ जुलैसारखा महापूर आला होता, तेव्हा पण मी मुंबईत होतो. पण त्यावेळीही असा पाऊस पाहिला नव्हता.” रेल्वे रुळांवरही पाणी साचले होते.

त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणारे अनेक प्रवासी रेल्वेतच अडकले होते. रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. पालिकेने पालिकांच्या शाळांमध्ये त्यांच्या निवास व भोजनाची सोय केली होती, अशी माहिती त्यांनी दिली. चहल म्हणाले – साधारणपणे ६५ मि. मी. पाऊस पडला तरी अतिवृष्टी मानले जाते. काल ३०० मि. मी. पाऊस पडला. एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातले  कोणतेही शहर तुंबणारच. साधारण पाऊस पडून पाणी तुंबले असते तर मेट्रोच्या कामांमुळे मुंबई तुंबल्याचे म्हणता आले असते. पण विक्रमी पाऊस पडल्याने मेट्रोवर खापर फोडता येणार नाही.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER