विधान परिषदेच्या १२ सदस्यांबाबत निर्णय केव्हा? हायकोर्टाचा राज्यपालांच्या सचिवांना सवाल

Mumbai HC - Governor - Maharashtra Today

मुंबई : राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा वाद आता मुंबई हाय कोर्टात पोहचला आहे. आज या वादावर मुंबई हायकोर्टाने थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सचिवांना विचारणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नावांवर अंतिम निर्णय कधी घेणार?, असा प्रश्न हायकोर्टानं राज्यपालांच्या सचिवांना केला आहे. हायकोर्टाने आज घेतलेल्या रोखठोक भूमिकेमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच लवकरच तोडगा काढतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

विधानपरिषदेच्या जागा रिक्त असल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्य मंत्रिमंडळानं १२ जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती. पण त्यावर अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यात राजकीय वादंग निर्माण झाले होते. राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरुन होणाऱ्या दिरंगाईवरुन महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री यांनीही विधानसभेत टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button