….जेंव्हा भारतीय टेनिसपटूंनी नामवंतांना दिले हादरे

Sumit Nagal - Ramkumar Ramnathan - Yuki Bhambri - Prajnesh Guneshwaran - Somdev Devburman

सुमित नागलच्या (Sumit Nagal) कामगिरीने अलीकडच्या काळात म्हणजे सन 2000 पासूनचा विचार करता भारतीय टेनिसपटूंनी (Indian Tennis Players) केलेल्या कामगिरीकडे लक्ष वेधले आहे.

Sumit Nagal: करियर की सर्वश्रेष्ठ 159वीं रैंकिंग पर सुमित नागल - indian  tennis player sumit nagal at career best 159th ranking | Navbharat Timesसुमीत नागल (Sumit Nagal)

सुमीत नागल हा गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठणारा पहिलाच भारतीय ठरला. पहिल्या फेरीत ब्रॅडली क्लानला मात दिल्यावर दुसऱ्या फेरीत तो डॉमिनिक थिएमसारख्या (Dominic Thiem) आघाडीच्या खेळाडूकडून पराभूत झाला. हा निकाल तसा अपेक्षितच होता कारण डॉमिनिक थिएम हा जगातील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असून तो क्रमवारीत सध्या तिसऱ्या स्थानी आहे. तीन ग्रँड स्लॅम (Grand Slam) स्पर्धांची त्याने अंतिम फेरी गाठली आहे. म्हणूनच त्याच्याशी मुकाबला करणे ही सोपी गोष्ट नव्हती याची नागलला जाणिव होतीच.

भारत के रामकुमार रामनाथन ने कोबे चैलेंजर में जीता युगल खिताब - india  ramkumar ramanathan wins doubles title in kobe challenger - Sports Punjab  Kesariरामकुमार रामनाथन (Ramkumar Ramnathan)

सुमित नागल हा डॉमिनिक थिएमला हरवू शकला नसला तरी एक भारतीय खेळाडू आहे ज्याने थिएमलासुध्दा हार पत्करायला लावली आहे आणि तो खेळाडू म्हणजे रामकुमार रामनाथन. जून 2017 मधील अंताल्या ओपन ग्रास कोर्ट स्पर्धेचा हा सामना होता.

त्यावेळी थिएम क्रमवारीत आठव्या तर रामकुमार 222 व्या स्थानी होता. तोवर थिएमच्या नावावर जोकोवीच, नदाल, फेडरर, मरे यांच्यासारख्या दिग्गजांना किमान एकदा तरी मात दिल्याचा विक्रम लागलेला होता. दुसरीकडे रामकुमार रामनाथन याला तर पात्रता फेरीतून मेन ड्रॉमध्ये स्थान मिळाले होते. त्यामुळे रामकुमारसारखा खेळाडू थिएमला मात देईल असा विचारही कुणी केला नव्हता. पण रामकुमारने ती अविश्वसनीय कामगिरी करुन दाखवली. रामकुमारने सरळ सेटमध्ये 6-3, 6-2 असा विजय मिळवला.

तब्बल 19 वर्षानंतर कुणी भारतीय खेळाडूने टॉप टेन खेळाडूवर विजय मिळविला होता. त्याआधी 1998 मध्ये तर लियांडर पेसने कमाल केली होती. त्याने त्यावेळचा नंबर वन पीट सम्प्रास याला पायलट पेन इंटरनॅशनल स्पर्धेत सरळ सेटमध्ये मात दिली होती.

रामकुमारने जुलै 2018 मध्ये न्यूपोर्ट येथील एटीपी स्पर्धेचीही अंतिम फेरी गाठली होती. स्टिव्ह जॉन्सनकडून पराभवाने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2011 मध्ये सोमदेव देवबर्मनने जोहान्सबर्गच्या एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यानंतर प्रथमच कुणी भारतीय खेळाडू एटीपी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता.

Yuki Bhambri bows out in 1st round of US Open - The Hinduयुकी भांबरी (Yuki Bhambri)

रामकुमारप्रमाणेच युकी भांबरीने ऑगस्ट 2017 मध्ये खळबळ उडवून दिली होती. त्याने एटीपी सिटी ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत माजी विजेत्या आणि त्यावेळच्या 22 व्या क्रमांकाच्या गेल मोनफिल्सला पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर मार्च 2018 मध्ये त्याने त्यावेळी 12 व्या क्रमांकावर असलेल्या लुकास पोईलला इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत हार पत्करायला लावली होती.

युकी हा फेब्रुवारी 2009 मध्ये ज्युनियर गटात जगात नंबर वन होता. ज्युनियर गटात तो ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता असून 2018 मध्ये तो सिनियर गटात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांसाठी पात्र ठरला होता पण पहिली फेरी पार करण्यात त्याला अपयश आले.

Indian tennis: Prajnesh Gunneswaran out of Australian Open after  straight-sets loss in first roundप्रज्नेश गुनेश्वरन (Prajnesh Guneshwaran)

प्रज्नेश गुनेश्वरन हासुध्दा ह्या युएस ओपन आधीच्या सलग पाच ग्रँड स्लॅम स्पर्धांसाठी पात्र ठरला होता. तो पहिली फेरी पार करु शकला नाही हा भाग वेगळा पण त्यानेही 2019 मध्ये 18 व्या क्रमांकाच्या निकोलस बासिलाश्विली याला मात दिली होती. इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा सामना त्याने 6-4, 6-7, 7-6 असा जिंकला होता. त्याआधी जून 2018 मध्ये त्याने त्यावेळी 23 व्या क्रमांकावर असलेला कॅनेडियन डेनिस शापोव्हालोव्ह याला दुसऱ्या फेरीत 7-6, 2-6, 6-3 अशी मात दिली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तो क्रमवारीत 75 व्या स्थानापर्यंत पोहोचला होता.

Somdev Devvarman Birthday | Somdev Devvarman Biography | Happy Birthday Somdev  Devvarmanसोमदेव देवबर्मन (Somdev Devburman)

भारतीय टेनिसपटूंच्या 21 व्या शतकातील यशात सर्वाधिक यश सोमदेव देवबर्मनचे आहे. एकतर तो जुलै 2011 मध्ये क्रमवारीत 62 व्या स्थानापर्यंत पोहोचला होता. दुसरे म्हणजे त्याने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांची पहिली फेरी पार केलेली आहे. त्याने 2009 मध्ये एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना त्यावेळच्या 42 व्या क्रमांकाच्या कार्लोस मोया व 25 व्या क्रमांकाच्या इव्हा कार्लोव्हिकला मात दिली. 2009 मध्ये लेग मासन टेनिस क्लासिक स्पर्धेत त्याने क्रोएशियाच्या मारिन सिलीकला पराभूत केले. 2011 मध्ये त्याने एटीपी मास्टर्स बीएनपी परिबास ओपन स्पर्धेत 22 व्या क्रमांकाच्या मार्कोस बघदातिसला धक्का दिला. मियामी मास्टर्स स्पर्धेत तो कॅनडाच्या मिलोस राओनिकला भारी पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER