‘अर्णबला भेटायला गेल्यावर पोलिसांनी उचलून बाजूला फेकलं’, किरीट सोमय्यांचा आरोप

kirit Somaiya

मुंबई : २०१८ मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक केल्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षात कलगीतुरा रंगला आहे. गोस्वामी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोस्वामींची अटक कायदेशीर पद्धतीनंच झाल्याचा दावा केला.

याचदरम्यान भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं असल्याचा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, हे पाहण्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनला आलो होतो. मात्र पोलिसांनी मला उचलून बाजूला फेकलं. कोणताही नागरिक साधं लांब उभं राहून पाहूदेखील शकत नाही. पोलिसांच्या कामात अडथळा आणला नसतानाही ही कोणती दादागिरी आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER