जेंव्हा चीनच्या हॅकर्समुळं गुगल बंद पडणार होतं !

Googel - Maharastra Today
Googel - Maharastra Today

कॉम्प्यूटर आणि इंटरनेट क्रांतीनंतर जगाचा चेहरा मोहराच बदलला. काम करण्याची पद्धतीत बदल झाला. जगभरता ज्या लढाया आधी गोळा बारूद, हत्यारं, बंदूका वापरुन व्हायच्या त्या आता तंत्रज्ञानावर होतात. याचच एक उदाहरण आहे ‘ऑपरेशन ऑरोरा.’ या सायबर हल्ल्यात अमेरिकेच्या ३४ कंपन्यांवर चीनी हॅकर्सनी हल्ला केला होता.

चीन आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांमध्ये वर्चस्वाची लढाई अनेक वर्षांपासून सुरु आहे. मग ते व्यापार क्षेत्र असो की तंत्रज्ञानाच क्षेत्र. कधी चीन तर कधी अमेरिका एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. ऑपरेशन ऑरोरानं सायबर वॉरचा नवा चेहरा जगासमोर पेश केला. चीनी हॅकर्सच्या या हल्ल्यात गुगलसह अमेरिकेच्या ३४ कंपन्यांवर हल्ला करण्यात आला. यानंतर चीनमधून काढता पाय घेण्याचा निर्णय गुगल घेणार होती.

हॅकर्सच्या हल्ल्यात गुगल स्वतःला वाचवू शकली नाहीत

गुगलनं १२ जानेवारी २०१० ला त्यांच्या ऑफिशिअल ब्लॉगवर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये गुगुलनं हॅकर्सनी गुगलवर हल्ला केल्याची बातमी कबुल केली. गुगलचे अनेक पेटटं आणि कॉपीराइट या हल्ल्यात चोरी झाल्याचं सांगण्यात आलं. जेव्हा जगभरात गुगलवर सायबर हल्ला झाल्याची बातमी आली तेव्हा संपूर्ण जग थक्क होतं. या हल्ल्याच्या काही दिवसांआधी याहू, एडोब सिस्टम्स, ज्युपिटर नेटवर्क सहित अनय् ३४ कंपन्या हॅकिंगच्या शिकार झाल्या होत्या. पुर्ण जगाला आश्चर्य होतं की हे शक्य झालंच कसं. जगभरातल्या अव्वल टेक कंपन्यांवर जर ही वेळ येत असेल तर स्वतःच्या सुरक्षेसंबंधी ते लोक चिंतीत होते.

अनेक मोठ्या कंपन्यांना या व्हायरसमुळं संकटांचा सामना करावा लागला होता. थोड्या तपासानंतर ही गोष्ट समोर आली की व्हायरस खुप आधीपासून अमेरिकेत होता. सायबर हल्ल्याचा वेग आणि प्रभाव प्रचंड मंद होता. त्यामुळं मोठ मोठ्या टेक कंपन्यांना याची खबर नव्हती आणि हळू हळू हॅकर्सनी कंपन्यांची इंटेलेक्चुअल प्रोपर्टी चोरी केली. गुगलच्या खुलाश्यानंतर व्हर्चूअल जगात जणू भुकंपाची परिस्थीतीच निर्माण झाली होती.

नंतरच्या काळात हा हल्ला चीननं तर केला नाही अशा शंका उपस्थीत केल्या जाऊ लागल्या. पक्की खबर लागेपर्यंत कुणीच काही बोलायला तयार नाही.

चीनच्या हॅकर्सनी केला होता हल्ला

गुगलच्या पोस्टनतर अमेरिकेच्या सर्वच सायबर सिक्यूरिटी कंपन्या सायबर हल्ल्यासंबंधित हॅकर्सच्या शोधात होत्या. ‘मॅकफी’ अँटी व्हायरस कंपनीचे अध्यक्ष दमित्रि अल्पेरोविच यांना या कामात आघाडी मिळाली. त्यांनी मालवेअर फाइल शोधून काढली जिचं नाव होतं ‘ऑरोरा.’ याच फायईलमुळं सर्व गडबड झाली असं मानलं गेलं. हॅकर्सनी ‘इंटरनेट इक्सप्लोरर’च्या माध्यमातून हा हल्ला केला.

सायबर सिक्यूरिटी कंपन्या रात्रंदिवस हॅकर्सच्या शोधात होत्या. रात्रंदिवस त्यांनी शोध सुरु ठेवला सर्व आय.पी. अॅड्रेस शोधले. मालवेअर सिग्नेचर आणि इतर बाबींचा तपास करण्यात आला. यानंतर अनेक रहस्यांवरुन पडदा उठला. या सायबर हल्ल्याच्या मागं एल्डरवूड हॅकर ग्रुप असल्याचं आढळलं. चीनच्या ‘पीपल लिब्रेशन आर्मी’चं हे एक युनिट होतं. ‘यूनिट ६१३८९’ या नावानं देखील सायबर युनिटची ओळख होती. ही गोष्ट समोर आल्यानंतर चीनवरचा संशय खरा ठरला; पण चीनी सरकारनं या हल्ल्यात सहभाग नसल्याचं सांगितलं.

लोकांनी गुगलला श्रद्धांजली वाहिली.

हॅकर्सचा सायबर हल्ल्यामागं प्रमुख उद्देश होता त्या मोठ्या कंपन्यांची ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी’ चोरण्याचा. यामुळं कंपन्यांच मोठं नुकसान होणार होतं. यासोबतच अनेक चायनिज आणि व्हिएतनामी मानवाधिकार कार्यकर्त्यांचे जी मेल अकाउंट हॅक करुन त्यांचे बँक डिटेल्स, आणि इतर माहिती चोरली होती. चीनी लोकांचा अमेरिकन कंपन्यांवरुन विश्वास उठावा, हा त्यांचा प्रमुख उद्देश्य होता.

चीनचं सर्च इंजिन ‘Baidu’ला पुढं आणण्यासाठी गुगलची बदनामी करु पाहत होतं. यानंतर ठरल्याप्रमाणं घडलं. लोकांनी गुगलच्या बिजिंग येथील मुख्यायलाबाहेर जाऊन तिच्यावर फुल चढवले. गुगलला श्रद्धांजली अर्पण केली. या सायबर हल्ल्याचा दुरोगमी परिणाम झाला. अनेक देशांनी इंटरनेट एक्सप्लोररवर बंदी घातली. इंटनेटच्या काळात जग वेगानं बदलतंय. युद्धाच्या पद्धतीतसुद्धा मोठा बदल झालाय. ऑपरेशन ऑरोरा त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button