जेंव्हा गडकरी अधिकाऱ्यांना तुमची लाज वाटते म्हणतात

Nitin Gadkari

नवी दिल्ली :- दिल्ली-मुंबई या ८० लाख १ हजार कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचे आपण अभिमानाने सांगतो आहे. इतका मोठा महामार्ग तीन साडेतीन वर्षात पूर्ण होणार असेल आणि दुसऱ्या बाजूला दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखे नाही. मला याची लाज वाटते आहे. जे विकृत विचारांचे लोक आहेत, त्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते.

ना. गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सध्याच्या अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाही. परतू, ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत काम केले, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा.

माझे नाव बदनाम झालेच आहे. रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावले. त्यांना सेवामुक्त केले हेच, माझे उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहीत आहेत. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचे वाईट करण्याचा नाही. पंरतु, आता अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

कामकाजाचा परामर्श घेताना संतापलेले गडकरी चांगलेच म्हणाले, अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचे अभिनंदन केले जाते. पंरतू, मला संकोच वाटतोय की, तुमचे अभिनंदन कसे करू ? कारण २००८ मध्ये इमारत उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. २०११ मध्ये याची निविदा निघाले आणि हे दोनशे-अडीशचे कोटींचे काम नऊ वर्षानंतर आज पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारे आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER