जेव्हा फिरोज खान हे राजकुमार यांच्याशी उद्धट वागले…

Firoz Khan & Rajkumar

फिरोज खान यांचे जुने चित्रपट ‘कुर्बानी’, ‘धर्मात्मा’ आणि ‘जांबाज’ आजही बऱ्याचदा टीव्हीवर दाखवले जातात.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता फिरोज खान आज आपल्यामध्ये असते तर त्यांनी आज त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा केला असता. फिरोज खान यांचे जुने चित्रपट ‘कुर्बानी’, ‘धर्मात्मा’ आणि ‘जांबाज’ आजही बऱ्याचदा टीव्हीवर दाखवले जातात.

गरीबीतही ग्लॅमर कायम राहिला

फिरोज खान यांचे खरे नाव झुल्फिकार अली शाह खान- असे होते. बंगलोरमध्ये सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते नशीब आजमावण्यासाठी मुंबईला गेले. त्यांनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांनंतर त्यांचा धाकटा भाऊ संजय खानही मुंबईला आला आणि पाहता-पाहता मोठ्या भावापेक्षा पुढे निघाला. फिरोज खान यांना १९६५ मध्ये ‘ऊंचे लोग में’मध्ये  ब्रेक   मिळाला. या चित्रपटात त्यांनी राजकुमार आणि अशोककुमार यांच्याबरोबर काम केले.

राज कुमार यांना दिली वाईट वागणूक

शूटिंगच्या पहिल्याच दिवशी राजकुमारबरोबर फिरोज खान यांची भेट झाली. तेव्हा राजकुमार यांनी फिरोज खान यांना बोलावून म्हटले, “हा एक मोठा चित्रपट आहे. यात भूमिका काळजीपूर्वक करावी लागेल.” राजकुमार समजावून सांगू लागले तेव्हा फिरोज खान हे मधूनच उठले आणि म्हणाले, “तुम्ही तुमचे काम तुमच्या पद्धतीने करत आहात. मी माझ्या पद्धतीने करणार.” फिरोज खानच्या अशा बोलण्याने युनिटमधील लोक नाराज झाले. राजकुमार हे त्या काळी मोठे नाव होते आणि कोणत्याही ज्युनिअर आर्टिस्टने ज्येष्ठ कलाकारांशी असे
वागणे बरोबर नव्हते.

राजकुमार यांचा मोठेपणा

प्रत्येकाला वाटले होते की राज कुमार दिग्दर्शकाकडे फिरोज खान यांची तक्रार करेल आणि त्यांना चित्रपटातून काढून टाकेल. राज कुमार यांनी असे काही केले नाही परंतु त्याऐवजी सर्वांसमोर फिरोज खानला सांगितले की मला तुमचे अकड आवडते. मीसुद्धा असेच आहे. कोणाचेही ऐकत नाही. हि अकड कायम राखा.

फिरोज खान यांच्या कार्याचे कौतुक केले

त्या चित्रपटात फिरोज खान यांच्या कामाचे कौतुक होऊ लागले. यानंतर, त्यांना कधीही मागे वळून पहावे लागले नाही. फक्त फिरोज खानच नाही तर राज कुमार सर्वांना ही कहाणी सांगत असत. फिरोज खान यांनीही आपली चूक असल्याचे कबूल केले. आपल्या ज्येष्ठ कलाकारांचा आदर केला पाहिजे.

अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही पाऊल ठेवले

फिरोज खान यांनी पटकन अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही पाऊल ठेवले. त्यांना वाटले की इतर लोक त्यांच्यासाठी चांगली भूमिका लिहित नाहीत. ते स्वत: साठी अशा भूमिका लिहीत असे, ज्यामध्ये काम करण्यास त्यांना मजा येत असे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER