जेव्हा तापसी पन्नूला एका फॅनने घातली लग्नाची मागणी

Tapsi Pannu.jpg

फॅन आपल्या आवडत्या कलाकारासोबत काय काय करतील याचा काही नेम नसते. दक्षिणेतील चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर तापसीने आता हिंदीतही आपले स्थान बळकट केले आहे. त्यामुळे तिच्या फॅनची संख्याही वाढू लागली आहे. तापसी सुंदर तर आहेच. तिच्या अभिनयानेही तिने अनेकांना भुरळ घातली आहे. त्यातच तिचे अजून लग्न न झाल्याने अनेकांना तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होत आहे. अशाच एका फॅनने तापसीला चक्क लग्नाची मागणी घातली. एवढेच नव्हे तर मी अजूनही व्हर्जिन असल्याचेही त्याने म्हटले. स्वतः तापसीनेच या फॅनने पाठवलेला ईमेल सोशल मीडियावर शेअर करीत मला अजून काय हवे असे गमतीत म्हटले आहे.

तापसीने याबाबत सविस्तर माहिती देताना म्हटले, 2018 मध्ये मला एका फॅनने ईमेल केला. यात त्याने मला लग्नाची मागणी तर घातलीच याशिवाय अनेक गमतीदार गोष्टीही लिहिल्या होत्या. त्याने लिहिले होते, हेलो तापसी पन्नू (Tapsi Pannu) आय लव्ह यू. तू माझ्याशी लग्न करशील का? मी व्हर्जिन आहे आणि मी दारु पीत नाही, सिगरेट पीत नाही आणि शाकाहारीही आहे. पाहिजे तर माझी लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करा. मी या टेस्टसाठी तयार आहे. यावर तापसीने उत्तर देताना गमतीत, आयुष्यात अजून काय पाहिजे असे उत्तर दिले. मात्र हा ईमेल सोशल मीडियावर टाकताना तापसी आपल्या त्या फॅनची ओळख पुसण्यास मात्र विसरली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER