
सोलापूर :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी काल शिवसेना सोडली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल असे सांगून भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले. महाविकास आघाडीतील नेत्यांबद्दल तक्रार करताना ते म्हणालेत की, माझ्या विरोधात मुख्यमंत्र्यांना भडकवण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरले. मी राष्ट्रवादीत असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी माझी महामंडळावर नियुक्ती केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन मी शिवसेनेकडून खासदारकीची निवडणूक लढवली. पक्षाकडून निवडणूक लढवण्याऱ्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संधी द्यायला पाहिजे होती. मात्र त्यांनी महामंडळ बर्खास्त केले!
ही बातमी पण वाचा : सर्व मिळून फडणवीसांशी लढू, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांचे विचारमंथन
अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला धक्का
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन अशोक चव्हाणांवर (Ashok Chavan) टीका करताना पाटील म्हणालेत की, अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला धक्का लागला. आरक्षण देण्यामध्ये शिवसेनाही भाजपासोबत होती. मात्र महाविकास आघाडीत अशोक चव्हाण यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले. मराठा समाजातील विविध संघटनानासोबत घेणे ही अशोक चव्हाणांची जबाबदारी होती. मात्र न्यायलाकडून स्थगिती मिळेपर्यंत त्यांनी कोणालाही जवळ केले नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला