दिल्ली जळत असताना काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधी अनुपस्थित

Rahul Gandhi - Delhi Violence

नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील हिंसाचारासाटी भाजपला जबाबदार धरताना तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकला असताना गृहमंत्री अमित शाह कुठे होते? असा सवाल त्यांनी केला. मात्र काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेसनेते राहुल गांधी अनुपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. ते परदेशात असल्याची सुत्रांची माहिती आहे.

दिल्लीतील हिंसाचारावरून पत्रकारांनी प्रश्न विचारले असता जावडेकर पत्रपरिषद सोडून निघून गेले

काँग्रेसच्या कार्यसमितीची आज बैठक झाली आणि त्यात दिल्लीतल्या हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हा मोठा हल्ला केला. अंत्यत महत्त्वाच्या विषयावर बैठक असाताना राहुल गांधींची अनुपस्थिती विरोधकांच्या नजरेतून न सुटणारी आहे. दिल्लीतील हिंसाचार सुनियोजित कट असून भाजपच त्याला जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर सोनिया गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्ली पोलिसांवर देखील हल्लाबोल केला. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए.के. अँटनी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम आणि प्रियांका गांधी हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पण राहुल गांधी या बैठकीत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते शशी थरूर यांनी पक्षाच्या नेतृत्वाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत वक्तव्य केले होते. राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार नसतील तर काँग्रेसला त्यांच्या जागी एका सक्रिय आणि पूर्णकालीन नेत्याची गरज थरूर म्हणाले होते.