चंद्रकांत पाटलांनी उचकवताच अजित पवार पहाटेच्या शपथविधीबाबत बोलायला लागले; मात्र फडणवीसांनी रोखले

मुंबई :- भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवर भाष्य करत सभागृहाचे कामकाज सुरू असताना टोला लगावला. ‘दोन्ही दादा… अजितदादा असो की चंद्रकांतदादा दोन्ही संवेदनशील, ठोस तत्काळ निर्णय घेतात. ’ असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. त्यानंतर घडलेल्या त्या किश्श्याची जोरदार चर्चा सुरू झाली. ‘तुम्ही रातोरात विषय काढला म्हणून बोलतो…’ असे म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. ‘ते ठोस निर्णय घेतात. रातोरात शपथ घेतात, हे आम्ही बघितले.’ असा  टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावताच पवार पलटवार करण्यास सज्ज झाले.

अकबरुद्दीन ओवेसी यांचा औरंगाबाद दौरा रद्द

मात्र त्याच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवार यांना उद्देशून खालून म्हटले की, ‘तुम्ही ऐकू नका आणि मीही ऐकत नाही.’ त्यावर ‘आता फडवणीस साहेब तुम्हीच बोलला म्हणून मी बोलत नाही. ’ असे म्हणत अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवर अधिक बोलणे टाळले. भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती तुटली आणि महाराष्ट्रात मोठे सत्तानाट्य सुरू झाले. २३ नोव्हेंबरला सकाळी अगदी नाट्यमयरीत्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर अजित पवारांनी भूमिका बदलल्याने ‘आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. ’ असे म्हणत भाजपने सत्तेपासून दूर होण्याची भूमिका घेतली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने या ऐतिहासिक आघाडीने सत्तास्थापनेचा प्रयत्न सुरू केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे राष्ट्रवादीचे आमदार राज्याबाहेर गेले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्र फिरवताच राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षाच्या गोटात दाखल झाले. आमदारांनी सोडलेली साथ आणि सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी घेण्याचा दिलेला आदेश, यामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले होते.