जेव्हा बिपाशाला काळी मांजर म्हटले होते..

Bipasha Basu - Kareena Kapoor

बॉलिवुडमध्ये (Bollywood) दोन नायिका एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी असल्याची उदाहरणे अभावानेच आढळतात. उमेदीच्या काळात आपल्यालाच सिनेमे मिळावे म्हणून नायिक अनेक गोष्टी करीत असतात. एखाद्या प्रतिस्पर्धी नायिकेचा सिनेमा पळवला की त्यांना खूप आनंदही होतो. एखाद्या सिनेमात दोन नायिका एकत्र असल्या की त्यांच्या कॉस्ट्यूमवरूनही दोघींमध्ये वाद झालेले आहेत. माझ्यापेक्षा तिचा कॉस्ट्यूम चांगला आणि महागडा आहे असा सूर अनेकदा नायिका काढत असत आणि निर्माता नायिकांचे लाड पुरवता पुरवता हैराण होत असे. बॉलिवुडमध्ये करीना कपूर आणि बिपाशा बसुमध्येही असेच कोल्ड वॉर अनेक वर्ष सुरु होते. खरे तर करीना आणि बिपाशाची तुलनाच होऊ शकत नाही परंतु तरीही करीना बिपाशाला पसंद करीत नसे. करीना (Kareena Kapoor) नेहमी बिपाशाचा (Bipasha Basu) दुस्वास करायची. यामागचे कारण मात्र कधीही समजले नाही. बिपाशाने सुरुवातीला करीनाच्या वागणुकीकडे लक्ष दिले नव्हते पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेले तेव्हा मात्र बिपाशानेही करीनाला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते.

2001 मध्ये आलेल्या ‘अजनबी’ सिनेमा बिपाशा आणि करीनाने एकत्र काम केले होते. या सिनेमात अक्षयकुमार आणि बॉबी देओल नायक होते. सिनेमाचे शूटिंग सुरु असताना कॉस्ट्यूम डिझायनरने दोघींसाठी ड्रेस बनवून आणले होते. परंतु करीनाला बिपाशाचा कॉस्ट्यूम खूप आवडला होता आणि त्यावरून दोघींमध्ये बाचाबाची झाली होती. करीनाला न सांगता बिपाशाने तिच्या ड्रेससाठी करीनाच्या कॉस्ट्यूम डिझायनरची मदत घेतल्याने करीनाच्या रागाचा पारा चढला होता. बाचाबाची सुरु असताना करीनाने चक्क बिपाशाच्या कानशिलात लगावली होती. एवढेच नव्हे तर बिपाशाचा ‘काळी मांजर’ म्हणून सगळ्यांसमोर उल्लेख केला होता. त्यातच आणखी भर म्हणून त्यावेळी बिपाशाचा बॉयफ्रेंड असलेल्या जॉन अब्राहमबाबतही बोलताना करीनाने त्याला ‘एक्सप्रेशनलेस’ असे हिणवले होते. यावर बिपाशानेही तू मोठी ‘एक्सप्रेशनवाली’ आहेस असे उत्तर करीनाला दिले होते.

या भांडणानंतर या दोघांनी कसाबसा सिनेमा एकत्र पूर्ण केला. दिग्दर्शकाने या दोघींची दृश्ये वेगळी शूट करून नंतर ती जोडल्याचेही सांगितले जाते. जवळ-जवळ सात वर्षे या दोघी एकमेकींशी बोलत नव्हत्या. पण 2008 मध्ये करीनाने पति सैफच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये बिपाशाला आमंत्रण दिले आणि त्यानंतर त्यांच्यात पुन्हा बोलणे सुरु झाल्याचे सांगितले जाते. मात्र बॉलिवुडमध्ये या गोष्टीवर अजूनही कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER