जेंव्हा बाळासाहेबांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता! काय आहे इंटरेस्टींग किस्सा?

Balasaheb Thackeray

महाराष्ट्राच्या राजकारणातलं डॅशिंग व्यक्तिमत्व, हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray). त्यांनी भारताला एका वेगळ्या शैलीचं लिखाण, राजकारण आणि व्यंगचित्र दिलं. मराठी माणसाचा मुंबईतला मान सन्मान परत मिळवणं असो की “बाबरी मशिद पाडण्यात माझा पाय होता.” हे विधान असो. त्यांनी सर्व दिशेचं राजकारण केलं. अगदी मुस्लीम लीगपासून ते हिंदूत्त्वादी भाजपासोबत युती केली. सत्ता मिळवली. बाळासाहेबांचा राजकारणात दरारा होता. त्यांचा शब्द अखेरचा शब्द अशी सवयच त्यावेळच्या माध्यमांना आणि टीका टिप्पणी करणाऱ्या राजकारण्यांना झाली होती. अशा कणखर व्यक्तीमत्त्वानं कधीच घुमजाव केला नाही; पण त्यांच्या आयुष्यात दोन असे प्रसंग आले जेव्हा स्वतःच्या रक्ता, मासानं, घामानं सिंचलेली शिवसेना (Shivsena) ते सोडणार होते.

जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या ‘जय महाराष्ट्र’ या पुस्तकात दोन्ही प्रसंग रंगवण्यात आले आहे. बाळासाहेबांनी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. पक्षानं टिकून राहण्यासाठी भूमिका घेतल्या, बदलल्या, शिवसेना टिकेल, वाढेल आणि जगेल यासाठी सर्व ते प्रयत्न केले. अशा संघर्षाच्या काळात त्यांनी अनेक अडीअडचणींना तोंड दिलं. दरम्यानच्या काळात दोनदा त्यांनी शिवसेना सोडत असल्याचं जाहीर केलं पण शिवसैनिकांसाठी देव बनलेल्या बाळासाहेबांना त्यांच्या भक्तांनी अजिबात सोडलं नाही.

‘मी पक्षाचा राजीनामा देतो’

मोठ्या संघर्षानंतर मुंबईत कॉंग्रेस, डावे आणि मुस्लीम लीगला टक्कर देत बाळासाहेबांनी मुंबईच्या राजकारणात स्थान मिळवलं. जनमत त्यांच्या मागे होतं. त्यांच्या नेतृत्त्वाचा आलेख जितक्या झटपट वर गेला तितक्याच ताकदीनं खाली आपटला. हे होणारंच होतं. परंतू बाळासाहेबांनी काही निर्णय आणि निवडणूका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. १९७८ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेला मान खाली घालायला लावणारी ठरली. यानंतर होऊ घातलेल्या मुंबई मनपा निवडणूकीत बाळासाहेबांनी संपुर्ण ताकद लावत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली, “जर या निवडणूकीत शिवसेनेला यश मिळालं नाही, मी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन.” असं भर सभेत बालासेब बोलले होते. तो काळ आणीबाणीचा होता आणि बाळासाहेबांनी इंदिरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. स्वतः इंदिरांना पराभव स्वीकारावा लागला होता. जनमत विरोधी निर्णय बाळासाहेबांचा होता असं चित्रं निर्माण झालं. आणीबाणीनंतर जोमात असलेल्या जनता पक्षाला मुंबईकरांनी साथ दिली. शिवसेनेला याचा फटका बसला.

आधीच्या मनपा निवडणूकीत १९७३ ला ४० शिवसेना आमदार निवडूण आले होते. मात्र बाळासाहेबांनी प्रतिष्ठेची केलेली १९७८ ची निवडणूक संख्या घटवणारी ठरली. ही संख्या २१ वर आली. यामुळं बाळासाहेब व्यथित झाले होते. “मुंबई मनपावर भगवा फडवण्यास मी अपयशी ठरलो. लोकांची माझ्यावर निष्ठा राहिली नाही. मी शब्दाला जागणारा माणूस आहे. मी पक्षाचा राजीनामा देतो” शिवाजी पार्कातल्या सभेत बाळासाहेबांनी उच्चारलेल्या या शब्दामुळं अनेकांना धक्का बसला. सर्व शिवसैनिकांनी त्यांची मनधरणी केल्यामुळं त्यांनी शिवसेना प्रमुखाचा दिलेला राजीनामा मागे घेतला.

अखेरचा दंडवत

९२ साली शिवसेनेत उद्धव आणि राज यांचं वर्चस्व वाढत होतं. मुंबईबाहेर शिवसेनेची घोडदौड सुरु होती. तेव्हा बाळासाहेबांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावं लागलं. माधव देशपांडे या जेष्ठ शिवसैनिक नेत्यानं शिवसेनेतल्या घराणेशाहीच्या नाजूक नसेवर बोट ठेवलं, देशपांडेंनी एका पुस्तकात “बाळासाहेब कण्या टाकून कोंबड्या झुंजवत आहेत.” यावर शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवावी अशी बाळासाहेबांची इच्छा होती. तसं काहीच घडलं नाही.

बाळासाहेब प्रचंड संतापले. त्यांनी दुसऱ्या दिवशी दैनिक सामन्यात आग्रलेख लिहला. शीर्षक होतं, ‘अखेरचा दंडवत’ आणि यातूनच त्यांनी जाहीर केलं की ‘आपण या पक्षात राहत नाही.’ शिवसैनिकांसाठी हा हदरा होता. मोठ्या आग्रहानंतर बाळासाहेबांनी निर्णय मागे घेतला. शिवसेना जोमानं कामाला लागली आणि पुढं तीन वर्षानंतर शिवसेनेनं विधानसभेवर भगवा फडकावत मुख्यमंत्रीपद खेूचन आणलं.

सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्त्रोतांमधून संकलीत केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button