खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रश्न विचारताच अजित पवारांनी हातच जोडले

Ajit Pawar-Eknath Khadse

सोलापूर : पक्षासोबत नाराज असलेले भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेहे (Eknath Khadse) लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्याप त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी चक्का हात जोडून पत्रकारांना नमस्कार केला. तसेच, नेहमीप्रमाणे याबद्दल आपणास काहीच माहिती नसल्याचे दुसऱ्यांदा पवार म्हणाले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)काल सोलापूर दौऱ्यावर (Solapur Visit) होते. यावेळी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अजित पवारांनी चक्क हात जोडले. तसेच, मला याबद्दल काहीही माहिती नाही. ज्या गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसं काय सांगणार? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी सविस्तर बोलण्याचे टाळले.

ही बातमी पण वाचा : योग्य वेळ येईल, वाट बघा; राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER