जेव्हा अपूर्वाचा पारा चढतो…

Purva Nemalekar

नुकत्याच संपलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये शेवंता (Shevnta) ही व्यक्तिरेखा साकारत अपूर्वा नेमळेकरने (Apoorva Nemalekar) प्रचंड लोकप्रियता मिळवली. हे तर आपण पाहिलेच आहे. अण्णा आणि शेवंता या जोडीने टीव्हीवरच्या रोमँटिक जोड्यांना  मागे टाकत मालिकेचा टीआरपी (TRP) वाढवला. आता ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका संपल्यानंतर अपूर्वा कुठे नव्या मालिकेत दिसणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते.

पण शेवंताचा रोल जरी संपला असला तरी तिचा  ठसका काही कमी झाला नाही हे अपूर्वाने नुकताच तिच्या एका ट्रोल करणाऱ्या चाहत्याला दाखवून दिले. अपूर्वा नेमळेकर आता नव्या मालिकेत येणार आहे ही बातमी काही आता नवी राहिलेली नाही. लवकरच ती ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेत दिसणार आहे. पम्मी हा रोल ती साकारणार आहे. लाल साडीमधील नखरेल डोळ्यांची अदा दाखवत तिचा लूक समोर आला आहे. या मालिकेतील लूकमधील फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. आता फोटो व्हायरल झाले म्हटल्यानंतर कमेंट तर येणारच. या फोटोमध्ये अपूर्वाचा अंदाज पाहता तिचा या मालिकेत कसा रोल असणार याचे आडाखे तिच्या चाहत्यांनी बांधायला सुरुवात केली. असाच मेसेज तिला तिच्या फोटोवर एका चाहत्याने दिला; मात्र त्या मेसेजमध्ये काहीसा टोमणा असल्याचा प्रकार लक्षात आला. अपूर्वा सोशल मीडियावरील नव्या मालिकेतील लूकमधले फोटो बघून त्या ट्रोलरने अशी प्रतिक्रिया दिली होती की, तुम्हाला सगळे बाहेरच्या स्त्रीचे रोल मिळतात का? म्हणजे आपली बायको सोडून दुसऱ्या बाईमध्ये गुंतलेल्या पुरुषाची नायिका अशाच रोलची ऑफर तुम्ही का स्वीकारता? ट्रोलरची ही कमेंट बघून अपूर्वचा राग मस्तकात गेला आणि तिने त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे. अजून या मालिकेचा एकही भाग प्रसारित झालेला नाही.  तसेच या मालिकेत माझा नेमका रोल काय असेल हेही अजून कळलेले नाही आणि त्यापूर्वी तुम्ही या मालिकेत मी बाहेरख्याली असलेली स्त्री किंवा पुरुषांना नादाला लावणारी असाच रोल करणार आहे हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढला? असे म्हणत चांगलेच सुनावले आहे.

अपूर्वा नेमळेकर | Tellychakkarइतकेच नव्हे तर ट्रोलरच्या नावावरून त्याला खडे बोल सुनावले आहेत. अपूर्वाच्या रोखठोक उत्तराची चर्चा सध्या टीव्ही आणि इंडस्ट्रीमध्ये जोरदार सुरू आहे.

अपूर्वा नेमळेकर हिने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत केलेली शेवंताची भूमिका चांगलीच गाजली होती. तर ‘आभास’ या मालिकेतून तिने नायिका म्हणून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती शेवंता या भूमिकेने . शेवंता ही व्यक्तिरेखा अण्णा नाईक त्यांच्या संसारात कालवाकालव करणारी स्त्री अशी होती आणि म्हणूनच नव्या मालिकेतही तिचा तोच रोल आहे असे समजून ट्रोलरने कमेंट केली. मात्र त्याला आता अपूर्वाने दिलेल्या उत्तरामुळे पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे.

नव्या मालिकेत अपूर्वा विनोदी पात्र साकारणार असून पम्मी ही काहीशी मिस्कील स्वभावाची भूमिका असल्याचे तिच्या या मालिकेतील प्रोमोवरून दिसत आहे. मात्र ही खास अदाकारी असलेली भूमिका असेल की निखळ विनोदी भूमिका असेल हे मात्र अजून अपूर्वानेदेखील गुलदस्त्यात ठेवले आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER