
विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन असून एक आक्रमक खेळाडूही आहे. अशा विराटला एखादी तरुणी मागून उचलेल अशी कल्पनाही करू शकत नाही. मात्र त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) मात्र त्याला मागून चक्क उचलल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एकदा नव्हे तर दोनदा अनुष्काने विराटला उचलले आहे. अनुष्काच्या या करामतीनंतर विराटच्या चेहऱ्यावरचे चकित करणारे भाव पत्नीवर त्याचे असलेले प्रेम स्पष्ट दाखवणारे आहेत. अनुष्का आणि विराट हे स्टार कपल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि सतत काही ना काही पोस्ट करीत असतात. या दोघांची फॅन-फॉलोइंगही जबरदस्त आहे. अनुष्काने नुकताच एक जुना व्हीडियो पोस्ट केला असून त्यात ती विराटला उचलताना दिसत आहे. या व्हीडियोला लाखों फॅन्सनी लाईक केले आहे.
काही वर्षांपूर्वी विराट आणि अनुष्का एका जाहिरातीचे शूटिंग करीत असतानाचा हा व्हीडियो आहे. विराट आणि अनुष्काची प्रेमकथा जाहिरातीच्या सेटवरच सुरु झाली होती. विराट कोहली आणि अनुष्काने लग्न केले आणि यावर्षी ११ जानेवारीला अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव वामिका असे ठेवण्यात आले आहे. अनुष्काने पोस्ट केलेल्या या व्हीडियोत अनुष्का गमतीत विराटला मागून मिठी मारते आणि चक्क उचलताना दिसते. सुरुवातीला विराटचा यावर विश्वास बसत नाही. तो पुन्हा एकदा तिला उचलण्यास सांगतो. तेव्हा अनुष्काही मला कसलीही मदत करू नको असे सांगते आणि पुन्हा विराटला मागून उचलते आणि खाली ठेवते. यानंतर अनुष्का तिचे दंडही किती मजबूत आहेत ते दाखवते. अनुष्काची ताकद पाहून विराटही चकित झालेला व्हीडियोत दिसतो. यासोबतच अनुष्काने लिहिले आहे, मी खरोखरच असे केले का?
या व्हीडियोवर आणि अनुष्काच्या कमेंटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका फॅनने यावर लिहिले आहे- ‘शक्तिमान अल्ट्रा प्रो मँक्स’. तर अन्य एका यूझरने लिहिले आहे, ‘हां तू खरोखरच असे केले आहेस’. तर अनेकांनी या जोडीची प्रशंसा केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला