जेवण करतांना पाणी कधी व कसे प्यावे ?

जेवण करतांना पाणी कधी व कसे प्यावे

या विषयावर अनेक वेळा घरात चर्चा होत असते. कुणी अगदी फ्रीजमधील थंड पाण्याची बाटली गटगट करून संपवते तर कुणी मुळीच पाणी पित नाही. परंतु या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत.

भोजना वेळी पाणी कधी प्यावे याचे काही नियम आयुर्वेदात सांगितले आहेत.

१) भोजना पूर्वी पाणी पिऊ नये. भूक लागते म्हणजे जठराग्नि वाढलेली असते. अशावेळी गटागट पाणी प्यायले की जठराग्नि मंद होतो. अन्नाचे पचन होत नाही. त्यामुळे कुपोषण, पोषक तत्त्वांची कमतरता व कृशता निर्माण होते.

२) भोजनानंतर लगेच पाणी पिणे – बरेच जण पूर्ण जेवणात पाणी पित नाही परंतु जेवण झाले की भरपूर पाणी पितात. हे सुद्धा चुकीचे आहे. यामुळे कफ वाढतो. पाचन होत नाही व शरीर स्थूल होते. आमविकार होतात.

३) भोजन करतांना थोडे थोडे पाणी प्यावे. घास ओला राहावा. आमाशयात आहार पचनाला चालना मिळावी. आहार आर्द्र राहण्याकरीता थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे जठराग्नि उत्तम राहते. अन्न पचन चांगले होते. शरीर सुदृढ राहते.

पूर्वापार आपल्याकडे आचमन करायला सांगायचे. जेवणापूर्वी व जेवणानंतर थोडेसे पाणी हातावर घेऊन ते पिणे. या आचमनामुळे मुखशुद्धी होऊन ते पाणी पूर्ण अन्ननलीका स्वच्छ करत आमाशयात पोहचते. ऐवढेच पाणी जेवणापूर्वी व जेवणानंतर गरजेचे आहे.

पाणी हे फ्रीजमधील नक्कीच नसावे. ऋतुनुसार पाणी घ्यावे. पावसाळ्यात उकळून थंड केलेले, उन्हाळ्यात वाळा घातलेले पाणी उपयोगी ठरते. पाण्याचा युक्तीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. तहान लागल्याशिवाय उगीचच पाणी पिणे मंदाग्नि सर्दी किडनीरोग निर्माण करतात त्यामुळे भोजन व पाण्याचे हे गणित नक्की लक्षात ठेवावे.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER