जेव्हा अनन्या पांडेला ‘फ्लॅटस्क्रीन’ मह्टले जात असे

Ananya Pandey

बॉलिवूडमध्ये दोन तीन महिन्यांपूर्वी ए का ब्रा, डी का ब्रा या नावाने एक सिनेमा आला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. एक चांगली खेळाडू पण सपाट छाती असल्याने मुलांच्यासोबतच मुलींच्याही टिंगलटवाळीचा विषय बनते. ती सतत याच न्यूनगंडात वावरत असते आणि त्यामुळे तिचा खेळ बहरत नाही. सपाट छातीसाठी ती खूप काही करू लागले. पण त्यामुळे तिची जास्तच अडचण होते. अखेर ती जसे आहे तसे स्वतःला सादर करण्याचे ठरवते आणि सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरते अशी कथा या सिनेमात खूपच चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली होती. आज या सिनेमाची आठवण होण्याचे कारण म्हणजे अनन्या पांडेने (Ananya Pandey) केलेले एक वक्तव्य. सुरुवातीच्या काऴात तिला ‘फ्लॅटस्क्रीन’ म्हणून हिणवले जात असे असे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.

प्रख्यात अभिनेता चंकी पांडेची (Chunky Pandey) मुलगी अनन्याने करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर अनन्याने अनेक सिनेमे केले आणि आता तर तिच्याकडे मोठ्या बॅनरचे सिनेमे आहेत. यात साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबतचा (Vijay Deverkonda) ‘लायगर’ही आहे, अनन्याने एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत खुलेपणाने सांगितले. अनन्या म्हणते, सुरवातीला म्हणजे मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आले नव्हते तेव्हा, मी माझ्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असे. तेव्हा मी अत्यंत काटकुळी होते. आईवडिलांबरोबर मी बाहेर जात असे तेव्हा मला सगळे जण ही मुलगी नसून मुलगा आहे असे म्हणत असत. मला फ्लॅटस्क्रीन म्हणत असत. सोशल मीडियावरील माझे फोटो पाहून मला ट्रोल केले जात असे. त्यामुळे मला खूप दुःख व्हायचे.

अनन्या पुढे सांगते, पण मी ट्रोलर्सकडे आणि मला हिणवणाऱ्यांकडे लक्ष दिले नाही. मी माझे काम करीत राहिले. स्वतःमध्ये आत्मविश्वास जागवत राहिेले. स्वतःच्या शरीरावर प्रेम करीत राहिले त्यामुळे माझे पाय ओढणाऱ्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष दिले नाही आणि त्यांना खूप दुःख झाले. मी हऴू-हऴू जे ठरवले होते ते पूर्ण करण्याकडे वाटचाल करू लागले होते. त्यामुळेच मी आज या स्थानावर पोहोचू शकले असेही अनन्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER