..जेंव्हा अमित मिश्रा सेहवागला म्हणाला होता, ‘ विरूभाई, पगार तेवढा वाढवून द्या!

Maharashtra Today

आयपीएलमधील (IPL). सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये असलेला दिल्ली कॕपिटल्सचा (Delhi Capitals) लेग स्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra) हा बलाढ्य मुंबईवरील त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 4 षटकात 24 धावा देताना रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या व किरोन पोलार्ड हे मुंबईच्या फलंदाजीचा कणा असलेले फलंदाज बाद केले. त्यामुळेच दिल्लीने सलग पाच पराभवानंतर पहिल्यांदा मुंबईवर विजय मिळवला. यासह त्याच्या नावावर आता 164 विकेट असून लसिथ मलिंगाचा सर्वाधिक 170 विकेटचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आता फक्त सात विकेटची गरज आहे.

त्याच्या या यशाने विरेंद्र सेहवागला (Virendra Sehwagh)पहिल्या आयपीएलमधील म्हणजे 2008 मधील अमितबद्दलची एक आठवण जागी झाली आहे. ती आठवताना सेहवाग सांगतो की, त्यावेळी अमितने हॕट्ट्रीक मिळवली होती आणि ती केल्यानंतर पगार वाढवून मिळण्याची मागणी विरुभाईकडे केली होती. त्यावेळी अमितने डेक्कन चार्जर्सचे लागोपाठ तीन चेंडूंवर तीन गडी बाद केले होते आणि सेहवाग त्यावेळी दिल्ली संघाचा कर्णधार होता.

अमितची प्रशंसा करताना सेहवागने सांगितले की, तो अतिशय शांत स्वभावाचा माणूस असून तो सर्वांनी नम्रतेने बोलतो.दोस्ती पटकन करतो त्यामुळे तो सहकाऱ्यांमध्ये आवडता आहे.म्हणून त्याची विकेट हुकते तेंव्हा सर्वच हळहळतात आणि त्याला विकेट मिळते तेंव्हा सर्वांनाच आनंद होतो. त्याने डेक्कनविरुध्द ती पहिली हॕट्ट्रीक मिळवली होती तेंव्हा मी त्याला विचारले होते….बोल, तुला काय पाहिजे? तर तो म्हणाला होता, “विरू भाई, कृपया माझा पगार वाढेल असे बघा!” आता इतक्या वर्षानंतर तो अशा परिस्थितीत असेल की त्याला आणखी हॕट्ट्रीक केली तरी पगारवाढ मागण्याची गरज पडणार नाही, असे सेहवागने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button