जेव्हा अमिषा पटेलला एअरलाईन स्टाफने केले चकित

Amisha Patel

कहो ना प्यार है हा पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर पुढेही काही हिट सिनेमे अमिषा पटेलने (Amisha Patel) दिले होते. परंतु ती स्टार होऊ शकली नाही. त्यानंतर ती लवकरच बॉलिवुडबाहेर फेकली गेली. तिचा भाऊ अष्मितही बॉलिवुडमध्ये काही विशेष करून दाखवू शकला नव्हता. अमिषाला गेल्या काही वर्षांमध्ये एकही मोठा सिनेमा ऑफर झाला नव्हता. सिनेमाच नसली तरी अनिषा अन्य बॉलिवु़ड कलाकारांमप्रमाणे सोशल मीडियावर मात्र चांगलीच अॅक्टिव्ह आहे. अमिषाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हीडियो सध्या चांगलच व्हायरल झालेला आहे. या व्हिडियोत अमिषा अत्यंत भावुक झाल्याचे दिसत आहे.

कहो ना प्यार है (Kaho na Pyar Hai) या सुपरहिट सिनेमानंतर अमिषाने 2001 मध्ये सनी देओलसोबत’गदर’ सिनेमात काम केले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर अमिषाने आणखी काही सिनेमे केले पण त्यांना यश मिळाले नाही. सिनेमात काम मिळावे म्हणून अमिषाने बोल्ड रूपही धारण केले पण त्याचा तिला काहीही उपयोग झाला नाही. ‘भैयाजी सुपरस्टार’ या सिनेमात ती शेवटची दिसली होती. त्यानंतर ‘बिग बॉस 13’ मध्ये ती घराची मालकीण बनूनही आली होती परंतु काही एपिसोडनंतर ती गायब झाली.

अमिषा काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यानंतर विमानाने परतताना तिला एक सरप्राईज मिळाले आणि ती चकित झाली. तिने अशा प्रकारच्या सरप्राईजची कल्पनाही केली नव्हती. अमिषा विमानात बसल्यानंतर एअरलाईनच्या क्रू मेंबर्सनी अमिषाचा पहिला सिनेमा ‘कहो ना प्यार है’च्या टायटल ट्रॅकवर डांस करण्यास सुरुवात केली. क्रू मेंबर्सचा डांस पाहून अमिषा खूपच भावुक झाली आणि तिला ‘कहो ना प्यार है’चे दिवस आठवले. अमिषानेही लगेचच क्रू मेंबर्सबरोबर गाण्यावर डांस करीत सगळ्यांचे आभार मानले. तिचा हा व्हीडियो सध्या चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER