जेव्हा पंकजा मुंडेंसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात तेव्हा …

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar), भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी नुकतीच हजेरी लावली . यावेळी तिथल्या कलाकारांनी साकारलेल्या पवार काका-पुतण्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नारायण राणे (Narayan Rane) यांच्यापासून डोनाल्ड ट्रम्पपर्यंत व्यक्तिरेखांना पाहून पंकजा, सुजय आणि रोहित पवार यांची हसून पुरेवाट झाली.

‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिका साकारली, तर डॉ. दीपक देशपांडे यांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची व्यक्तिरेखा उभी केली. थुकरटवाडीच्या फार्म हाऊसचे मालक म्हणून विशेष खुर्चीत बसणारे अभिनेते स्वप्नील जोशी यांना साबळेंनी प्रवीण तरडेंची उपमा दिली. तर ‘मुंबई पुणे मुंबई’ सिनेमाच्या धर्तीवर ‘पिंपरी चिंचवड हडपसर पिंपरी चिंचवड’ असा सिनेमा काढण्याची विनंती साबळेंच्या रूपातील अजित पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER