जेव्हा आमिरने म्हटले होते, शाहरुख माझ्या कुत्र्याचे नाव

Shahrukh Khan - Aamir Khan

बॉलिवूडमध्ये (Bollywood) दोन कलाकारांमध्ये प्रचंड मैत्री असल्याची उदाहरणे फार अभावानेच आढळतात. चित्रपटात मित्रांची भूमिका करणारे पडद्यावर एकमेकांसाठी प्राण अर्पण करायला तयार असतात. परंतु वास्तवात मात्र एकमेकांचे तोंडही न पाहाण्याचा निर्णय घेत असतात. मात्र बॉलिवूडमध्ये असे म्हटले जाते की, येथे कोणीही कोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कोणी कायमचा मित्रही नसतो. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे शाहरुख खानने (Shahrukh Khan) आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढाचा प्रचार करण्यास होकार दिला आहे. आमिर खानच्या या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स शाहरुख खानची कंपनीच करीत आहे. खरे तर आमिर खान त्याच्या चित्रपटाच्या प्रचाराची धुरा स्वतः सांभाळतो. परंतु व्यावसायिक कारणाने शाहरुख-आमिर एकत्र आले आहेत.

15-17 वर्षांपूर्वी जेव्हा आमिर आणि शाहरुख यशाच्या शिखरावर होते तेव्हा या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. या दोघांना एकत्र आणण्याचे काम अनेक निर्मात्यांनी केले पण ते यशस्वी झाले नाहीत. 2008 मध्ये आमिर खानचा ‘गजनी’ चित्रपट रिलीज होणार होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित कार्यक्रमात आमिर खान म्हणाला होता, माझ्या घरातील नोकराच्या कुत्र्याचे नाव शाहरुख आहे. मी जेव्हा महाबळेश्वरमधील घर विकत घेतले तेव्हा त्या केअरटेकरबरोबर हा कुत्राही आला. मी त्याला बिस्किट दिले की तो माझे पाय चाटतो. आमिरच्या या वक्तव्यावरून प्रचंड हंगामा झाला होता. याबाबत शाहरुखला प्रतिक्रिया विचारली असता, मला अशा गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. मीसुद्धा कधी कधी अशी चेष्टा करतो असे म्हणत त्याने आमिरच्या वक्तव्यावर टीका करणे टाळले.

हे दोघे आजवर कधीही एकत्र आलेले नाहीत. आता मात्र या दोघांना व्यावसायिक संबंधांनी एकत्र आणल्याने बॉलिवु़डमध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो या उक्तीवर शिक्कामोर्तब झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER