शिवसेनेने मुस्लीम आरक्षणावर सेटिंग केलेली आहे काय? – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis-Uddhav thackeray

मुंबई :- मुस्लिमांना आरक्षण दिल्यामुळे त्याचा ओबीसी आणि मराठा आरक्षणावर परिणाम होणार असून या आरक्षणला आमचा विरोध आहे. सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेची आघाडीतील घटन पक्षांसोबत काय, काय सेटिंग झाली होती? असा सवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे सरकारने मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली असून त्याला भाजपने विरोध केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत राज्यातील मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात तरतूदच नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण लागू केलेले आहे. असे असताना राज्य सरकारने मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्याला आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेच्या धोरणांचा सांधाबदल; मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा