गोपनीयतेसंबंधी व्हॉट्स अँपने आणली नवी पॉलिसी

नवी दिल्ली : गोपनीयतेसंबंधी अटी आणि धोरणांबाबतची पॉलिसी (privacy policy) व्हॉट्स अँपने (WhatsApp) पुन्हा आणली असून गुरुवारी ती जाहीर केली आहे. गोपनीयतेसंबंधीच्या अटी आणि धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी युजर्सचा गोंधळ होऊ नये यासाठी शब्दांचा काळजीपूर्वक वापर केला आहे.

व्हॉट्स अँपमध्ये एका छोट्या बॅनरकाली आपली नवीन पॉलिसी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. १५ मेपर्यंत ही पॉलिसी स्वीकारावी लागणार आहे. व्हॉट्स अँपची नवी पॉलिसी आल्यानंतर जगभरातून त्यावर टीका झाली होती. त्यानंतर व्हॉट्स अँप सोडून अन्य अँपवर शिफ्ट होण्याचे प्रमाण वाढले होते. भारतीय युजर्सनी टेलिग्रामचा पर्याय निवडला होता.

त्यानंतर ही पॉलिसी लागू करण्याची तारीख पुढे ढकलली होती. टीका झाल्यानंतर आणि तोटा सहन करूनही कंपनीने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केलेला नाही. कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हॉट्स अँपने सादर केलेल्या पॉलिसीत म्हटले आहे, मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच, नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे. खासगी मेसेज आधीप्रमाणेच एंड टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. दरम्यान, नवीन पॉलिसी आणल्यापासून व्हॉटस अँपला रामराम करत सिग्नल, टेलिग्राम आणि संदेश यांसारख्या अँप्सवरील युजर्स वाढत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER