व्हॉटस् अ‍ॅपने नवे धोरण स्वीकारण्याच्या मुदतीस केली वाढ

Whatsapp

नवी दिल्ली : यूजर्सकडून वाढत चाललेल्या दबावामुळे आणि नव्या गोपनीय धोरणाविषयी नेटिझन्समधून होत असलेल्या विरोधामुळे, अखेर व्हॉटस् अ‍ॅपने नवे धोरण स्वीकारण्याच्या मुदतीमध्ये १५ मे पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी नवे धोरण ८ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारले नाही तर व्हॉटस् अ‍ॅप यूजर्सचे अकाउंट व्हॉट्स अॅपकडून (WhatsApp) बंद करण्यात येणार होते.

नेहमीच यूजर्सच्या गोपनीयतेबद्दल पुढाकार घेणाऱ्या व्हॉटस् अ‍ॅपकडून काही दिवसांपूर्वी गोपनीय पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्यात आला. नव्या बदलानुसार फेसबुकला व्हॉटस् अ‍ॅपवर देखरेख करण्याचे अधिकार मिळणार आहेत. नेमक्या याच गोष्टीला यूजर्सकडून नकारघंटा मिळाली. नवे धोरण आमच्या गोपनीयतेचा भंग करते असा आरोप करून अनेक यूजर्सनी व्हॉटस् अ‍ॅपला रामराम ठोकण्याची तयारी केली होती. यातले बरेचसे यूजर्स टेलिग्राम व सिग्नल सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅपकडे वळल्याचेदेखील काही संस्थांनी केलेल्या निरीक्षणातून समोर आले आहे. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता व्हॉटस् अपने काहीशी माघार घेतली आहे. आता नव्या निवेदनानुसार व्हॉटस् अ‍ॅपने नवे गोपनीय धोरण स्वीकारण्याची मुदत १५ मे पर्यंत वाढवली आहे. तसेच नेटिझन्समध्ये असणाऱ्या या धोरणाविषयीच्या गैरसमजांना दूर करण्यासाठी कंपनी आता काम करणार असल्याचे अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER