माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर काय चुकल? विजय वडेट्टीवारांची नाराजी

Vijay Vadettiwar

मुंबई : राज्यात लॉकडाऊन (Lockdown)हटवण्याच्या मुद्यावरून महाविकास आघाडीमधीलमतभिन्नता चव्हाट्यावर आली. याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे विचारणा केली. उत्तरात वडेट्टीवार यांनी – माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर काय चुकल? अशी नाराजी व्यक्त केली.

ते म्हणालेत की, मंत्री राजेश टोपे शाळांच्या परीक्षा होणार की नाही, याबद्दल बोलत असतील तर मी माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर त्यात चूक काय? राजेश टोपे (Rajesh Tope)आरोग्य मंत्री आहेत. पण ते अनेक विषयांबद्दल बोलतात. त्यांना कुणीही काही बोलत नाही. मग मी बोलल्यानंतर एवढा गोंधळ का?

अँलोकांबाबतच्या प्रस्तावाला अंतिम स्वरुप प्राप्त झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर करणार होते. पण, विजय वडेट्टीवार यांनी बारावीच्या परीक्षाबद्दल सांगत असताना अनलॉकची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे स्वत: घोषणा करत असता. पण विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar) यांनी माहिती जाहीर केल्यामुळे अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button