‘मी मास्क वापरात नाही हे म्हणण्यात काय शौर्य?’; नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

CM Uddhav Thackeray - Raj Thackeray - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात दररोज वाढत असलेल्या कोरोना (Corona) रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. आज राज्यात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली जाणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला असून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरण, इतर देशांची परिस्थिती, आदी विषयांवर भूमिका मांडली.

विरोधकांबरोबरच यावेळी मुख्यमंत्र्यांनी थेट नाव न घेता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. मी मास्क वापरात नाही हे म्हणण्यात काय शौर्य?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचं नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधला. आतापर्यंत अनेक कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क दिसले होते. तर मी मास्क घालत नाही, असंही ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. यानंतर मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी राज ठाकरेंना मास्क घालण्याचं आवाहन केलं होतं.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले, नारायण राणेंचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button