शेतकऱ्यांशी चर्चा करायला हरकत काय? अजित पवारांचा केंद्र सरकारला प्रश्न

Ajit Pawar

मुंबई :- कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांचा पाठिंबा आहे. कायद्यात बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून, शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारला (Central Government) केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, कृषी कायद्याबाबत आज राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, आज कृषी कायद्याबाबत प्राथमिक चर्चा होत आहे. एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. माझी वैयक्तिक भूमिका असून, महाविकास आघाडीची नाही. असेही ते म्हणाले.

कृषी कायद्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होत आहे. आता आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टानेही केंद्राला सांगितलं चर्चा करा. ते आंदोलन चिघळलं आहे. शेतकरी म्हणतात आमची भूमिका मान्य करा. काही प्रमाणात काही निर्णय घेतले जातील. बिल रद्द करा असं शेतकरी संघटनांचं मत आहे. महाविकास आघाडी सरकारने या बिलाविरोधातील आंदोलनाला तिन्ही पक्षाने समर्थन दिलं आहे. आज प्राथमिक चर्चा होणार आहे. आज काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा. सगळ्यांशी चर्च करु. मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही, असं अजित पवारांनी नमूद केलं.

दिल्लीत आंदोलन सुरु आहे. त्या दबावाखाली केंद्र बदल करेल असा अंदाज आहे. ते बदल काय असतील त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी नमूद केलं.

साखरप्रश्नाबाबत अजित पवार म्हणाले, 310 लाख टन साखर तयार होईल असा अंदाज आहे. तेवढी साखर परदेशात निर्यात केली. अनुदान जाहीर केलं. जो साखरेचा दर 31 रुपये ठरवला तो वाढवावा , यामुळे 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 31 रुपये दर वाढवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येत आहे. आमचा अंदाज आहे त्यात काही मदत होईल, किती होईल सांगणे उचित होणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.

हायकोर्टाने कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या (Kanjurmarg Metro Shed) कामाला स्थगिती दिली आहे. यासंदर्भात आज पाच वाजता एमएमआरडीएची (MMRDA) बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावेळी याबाबत चर्चा होईल, असं अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER