चर्चा काहीही होऊ द्या ममता बॅनर्जीच जिंकणार ; संजय राऊतांच्या विश्वास

Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election Results 2021) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC)आघाडी आणि भाजपमध्ये(BJP) काँटे की टक्कर सुरू आहे. मात्र, तृणमूल काँग्रेस जवळपास विजयाच्या वाटेवर आहे . शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी या निवडणुकीवर भाष्य केले .

तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कोणत्याही राज्यात सत्तापरिवर्तन होणार नाही असा दावा राऊत यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता बनवणार असा विश्वास राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. चर्चा काहीही होऊ द्या ममताच जिंकणार असून त्यांचा पराभव करणं शक्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली होती  .  भाजपच्या जागा वाढणार आहेत. त्याबद्दल त्यांचे  कौतुक करायला हवं. देशात कोरोनाचं संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. याबद्दल त्यांचे  कौतुकच करायला हवे , असा खोचक टोला त्यांनी लगावला. 

ही बातमी पण वाचा : पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी विजयी झाल्यास, तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल’ – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button