काहीही झाले की राष्ट्रपती राजवटीची मागणी ; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

BJP - Jayant Patil

मुंबई : मुंबईत कारमध्ये स्फोटके सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे . राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजपाकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपला (BJP) टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात काही झालं तरी विरोधक राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात, आतापर्यंत आठ ते नऊ वेळा मागणी करण्यात आली असून दरमहिन्याला ही मागणी होत असते आणि त्यात नवीन काय आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला लगावला आहे.

सचिन वाझे (Sachin Vaze) आणि परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर गृहमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारच्या बदलाची आवश्यकता नाही आणि आमच्या मनात असा विचारही नाही.’ असे सांगत गृहमंत्री बदलला जाणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER