राज्यासाठी जो निर्णय असेल तो पुण्यासाठी नको : अजित पवार

Ajit Pawar Maharastra Today

पुणे :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात लॉकडाऊनशिवाय (Lockdown) पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यासाठी जो निर्णय असेल तो घ्या, आमचा पाठिंबा आहे. मात्र, जो निर्णय घ्याल, तो पुण्याला लागू करू नका, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची (NCP) भूमिका मांडली. पवार यांनी लॉकडाऊनला विरोध न करता पुण्याला वगळण्याची मागणी केली आहे.

गरिबांना मदत द्यावी
“लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरिबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे. तसेच ऑक्सिजनसंदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडिसीवीरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. काही ठिकाणी MBBS डॉक्टरचे मानधन कमी आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झाले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button