अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळे त्यावर त्यांनी स्वत:च लेबल लावू नये ; निलेश राणे

Nilesh Rane - Sharad Pawar - Ajit Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे (BJP) आमदार आणि काही नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला . यावरून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पवारांवर टीका केली आहे.

अजित पवार हे स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे, असं निलेश राणे यांनी म्हटले आहे.

अजित पवारांचा स्वत:चा आमदार आहे असं चित्र महाराष्ट्रात तरी नाही त्यामुळे त्यांनी मोठ्या गोष्टी करू नये, असेही ते म्हणाले .

पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच, त्यावर स्वत:चं लेबल लावू नये. पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात. लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात, असंही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : …  स्वत:चे आमदार टिकवता आले नाही ते परत निवडून आणण्याची भाषा करतात – निलेश राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER