आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जाण्याऱ्या महत्वाच्या नेत्याबद्दल काय बोलणार – शरद पवार

Sharad Pawar-Chandrakant Patil

सोलापूर :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली.

निवडणूक जिंकण्यासाठी ज्यांना आपलं गाव सोडून दुसऱ्या गावाला जावे लागते अश्या महत्वाच्या नेत्याबद्दल मी काय बोलणार, अशी खोचक टीका पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री योग्य तर्हेने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचे  प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER