सरकार माझ्यावर पाळत ठेवून काय साध्य करणार? संभाजीराजेंचा सवाल

Sambhaji Raje Bhosale

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून आक्रमक भूमिका घेत खासदार संभाजीराजे यांनी आता सरकारवर आरोप केले आहे. माझ्यावर पाळत ठेवल्याचा दावा स्वतः संभाजीराजेंनी  केला आहे. याबाबत संभाजीराजे (Sambhaji Bhosale) यांनी ट्विटसुद्धा केले आहे.

ते म्हणाले की, “सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर मराठा आरक्षणाबाबत ६ जूनपर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास रायगडावरून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रसंगी आम्ही कोरोना वगैरे बघणार नाही. त्यावेळी सर्वांत पुढे मी असेन, असेही ते म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button