इंदिराजींना जे शक्य झाले नाही ते यांना काय जमणार? फडणवीसांचे ठाकरे सरकारला आव्हान

Devendra Fadnavis

मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात पोलीस बळाच्या जोरावर भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. भाजपाला दाबू असे या सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही अशा खूप लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. भाजपाचा डीएनए संघर्षाचा आहे. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असे ठाकरे सरकारला बजावताना भाजपाचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत – इंदिराजींना जे शक्य झाले नाही ते यांना काय जमणार?

भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला. मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ठाकरे सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पुढच्या काळात पोलीस तंत्राचा वापर करून भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली जाणार आहे. आम्ही त्याची चिंता करत नाही. आमचा डीएनए संघर्षातून तयार झालेला आहे. आम्ही खूप लाठ्याकाठ्या खाल्ल्या. तुरुंगात गेलो. लाठ्याकाठ्या खाण हा आमचा रोजचाच धंदा आहे, असे फडणवीस म्हणालेत.

ठाकरे सरकारला आव्हान देताना ते म्हणालेत, पोलिसी बळावर विरोधी पक्षाला दाबू असे सरकारला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. आम्हाला तुम्ही दाबू शकत नाही. कार्यकर्त्यांनो तयार राहा. ते तुम्हाला पुढच्या काळता त्रास देतील. तुम्ही घाबरू नका. जे इंदिराजींना जमले नाही, ते यांना काय जमणार.

कायद्याने वागा, पोलिसांना सल्ला

कायद्याने वागा, असा सल्ला फडणवीसांनी पोलिसांना दिला. ते म्हणाले, पोलिसांनी कायद्याने वागावे ही त्यांना विनंती आहे. सरकार येतात आणि जातात. हे लक्षात ठेवा. कुणावरही विनाकारण कारवाई करू नका. जे नियमात असेल तेच करा. आम्ही चुकत असेल तर जरूर कारवाई करा. घाबरू नका. पण नियमांच्या बाहेर जाऊ नका.

सरकार बदलताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते?

या सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्याविरोधात आणि माझ्या पत्नीविरोधात ट्विट करण्यात आले. त्यासाठी आम्ही कुणाला जेलमध्ये टाकले नाही. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना फसवण्याचा प्रयत्न झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला चपराक दिली. माझ्याविरोधातही गोस्वामी बोलले होते. ‘शो’ही केले होते. पण त्यांना मी तुरुंगात टाकले नाही, असे ते म्हणाले.

आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना त्यावर बोलणारे पत्रकार आणि संपादक कुठे आहेत? आता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसत नाही का? या सरकारलाही ‘टॉलरन्स’ म्हणजे काय ते शिकवा ना? की सरकार बदलताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्याही बदलते, असा सवाल करतानाच या देशातील तथाकथित उदारमतवादी लोक दुटप्पी आहेत, असा टोमणा फडणवीसांनी मारला. (devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)

ही बातमी पण वाचा : तोंड लपवायची वेळ आल्याने नितीन राऊत सांगत आहेत चूक आकडेवारी; फडणवीस यांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER