
पुणे :- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झडली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी चिमटा काढला आहे. अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या कोरोना लसीचे उत्पादन पुण्यात होत असून ते पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत, यापेक्षा राज्य सरकारचे दुसरे यश काय असणार? असे कौतुकोद्गार काढत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘त्या स्वप्नात आहेत का’? असे एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे.
ही बातमी पण वाचा : चंद्रकांत पाटील यांनी बारा वर्षे पाट्या टाकल्या त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात मते मागण्याचा अधिकार नाही
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांचं शिक्षण यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर काम केले आहे. मात्र आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वर्षभरात सरकारने यात काहीच काम केलं नाही. ते काम व्हावं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तसेच महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा ही आमची सुरूवातीपासूनची मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार? असा टोला त्यांनी लगावला. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना पाटील म्हणाले, राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो, वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत हे सरकार खात्री देत नाही, असं पाटील म्हणाले.
ही बातमी पण वाचा : फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली हे महत्वाचे, संजय राऊतांचा टोला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला