काय होते रावणाचे ‘ते’ सात स्वप्न? जे कधीच पुर्ण होऊ शकले नाही!

What were Ravana's 'those' seven dreams? Which could never be completed!

रावण (Ravana) अतिमहत्त्वकांक्षी अतिज्ञानी, होता प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करण्याची त्याच्यात ताकद होती. पण अहंकारामुळं त्याचा विनाश झाला. या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत पण रावणाच्या सात अशा महत्त्वकांक्षा होत्या ज्या तो पूर्ण करु शकला नाही. रावणाच्या सात अपूर्ण स्वप्नांची ही गोष्ट.

पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत त्याला बांधायची होती शिडी.

प्रत्येक सामान्य माणसाला स्वर्ग पाहता यावा. म्हणून रावणानं पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत शिडी बनवायला सुरुवात केली होती. यासाठी त्यानं खुप सारं जप तप केलं होत. लंकेत युद्धाला सुरुवात झाली होती तेंव्हाही त्या शिडीचं बांधकाम सुरुच होतं. अशा अनेक कथा रावणाच्या व्यक्तीमत्वाशी जोडल्या गेल्या. शिडी बांधून तयार झाल्यानंतरच्या काही दिवसातच प्रभू श्रीरामांनी त्याचा वध केला.

समुद्राचं पाणी गोडं करणं

शास्वत विकास आणि नैसर्गिक संसाधनांचा सर्वासाठी होणारा वापर .या गोष्टींची आपण आज चर्चा करत असलो तरी, रावणाने हजारो वर्षापूर्वींपासून या विषयावर काम करायला सुरुवात केली होती. नैसर्गिक साठे मर्यादित आहेत. यामुळं बऱ्याच लोकांना अडचणींना सामोरं जाव लागतं.

पृथ्वीवर पिण्यायोग्य गोड्या पाण्याचा साठा खूप कमी आहे. येत्या काळात तो कमी पडेल हा विचार करुन त्याने समुद्र गोडा करण्यासाठी काय करता येईल, असा विचार रावणाने मांडला होता.

सोन्याला करायचं होतं सुंगधी

सोनं सुगंधी असावं अशी रावणाची इच्छा होती. त्याला सोन्याची खूप आवड होती. त्यानं पूर्ण लंका सोन्याची बनवली होती. सोनं सुंगधी केलं तर ते शोधायला ही सोईस्कर होईल असा त्याचा विचार होता.

रंगभेद संपवण्याची होती त्याची इच्छा

रंगभेदामुळं कितीपत वाईट परिणाम होवू शकतात हे अमेरिकेतल्या काही घटनांमुळं आपल्या समोर आलंय. भारतात रंगाच्या आधारावर हिंसा होत नसली तरी हिणवलं मात्र जातं. रावण स्वतः रंगाने काळा होता. त्याच्या लहानपणीही त्याला हिनवायचे. म्हणून रंगभेद कायम स्वरुपी त्याला नष्ट करायचा होता.

रक्ताचा रंग पांढरा करण्याची होती त्याची इच्छा

महत्त्वकांक्षी रावणाने सोन्याची लंका संघर्षातून उभारली. अनेक युद्ध केली. त्यात अनेकांचा त्याने जीव घेतला होता. त्याच्याद्वारे होणाऱ्या हत्त्येचा कोणालाही पत्ता लागू नये म्हणून रक्ताचा रंग पांढरा करण्याची त्याची इच्छा होती.

विना वासाची दारू बनवण्याची होती त्याची इच्छा

रावणाला अशी दारू बनवायची होती. जी पिल्याने कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही. ज्यामुळं सर्वांनाच दारूचा अस्वाद घेता येईल.

अशा अनेक विचित्र स्वप्न रावणाने पाहिले होते. तसे अनेक उल्लेख्ख पुराणांमध्ये सापडतात. रामायणाचे अनेक व्हर्जन आहेत. त्यात प्रत्येकाने रावण आपआपल्या पद्धतीने मांडला आहे. रावणसंहितेमध्येही रावणाच्या बुद्धीमत्तेचा आणि कल्पना शक्तीचा अंदाज येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER