
एखादी छोटीशी नजर चुक केल्या कामाचा सत्यानाश करु शकते. रागाच्याभरात घेतलेल्या निर्णयांमुळं जिंकलेला डाव हातून निसटतो. अशीच एक चुक ज्यामुळं मराठ्यांचं पानिपत झालं, त्याची ही कहाणी. ज्यामुळं मराठा साम्राज्याचा उत्तरेवरील ताबा जवळपास निसटला होता.
१७६१ सालाची ही कहाणी आहे. हा तो काळ होता जेव्हा संपूर्ण हिंदोस्तानावर राज्य करणारे मुघल पराक्रमी मराठ्यांचे आश्रीत बनले होते. उत्तरेत मल्हारराव होळकरांचा दबदबा होता. दिल्ली दरबारात मराठ्यांच्या समंतीशिवाय पानही हलत नव्हतं. सारंच काही शांत होतं पण वायव्याकडून घोंगवत एक क्रूर व कपटी वादळ पंजाबला धडकलं. त्याने पंजाब काबीज केला. आणि आता रोख दिल्लीच्या दिशेने होता. मोहम्मद शाह अब्दाली (Mohammad Shah Abdali) दिल्लीच्या दिशेने चालून आला. अशा परिस्थीतीत दिल्ली रक्षणाची जबाबदारी शूरवीर मराठ्यांवर होती.
३१ वर्षाच्या सदाशिवरावांच्या नेतृत्त्वाखाली दख्खनेतून मराठा फौजेनं दिल्लीच्या दिशेने कुच केली. आणि त्यांच्या सोबत होते विश्वासराव पेशवा. जे या युद्धात मारेल गेले आणि एका म्हणीनं जन्म घेतला. जो महाराष्ट्राच्या बोली भाषेचा हिस्सा बनली. ती म्हणं तुम्हाला पुढे वाचायला मिळेलच.
हैद्रबादच्या निझामाला उदगीरच्या लढाईत लोळवल्यानंतर सदाशीव भाऊंचा पुणे दरबारातला वट वाढला होता. त्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा फौजेने अनेक मोठ्या लढाया जिंकल्या होत्या. जिथं सदाशिव भाऊ (Sadashiv Bhau) तिथं विजय हे ठरल्यासारखं समीकरण होतं. त्याच विजयश्रीच्या शोधात मराठ्यांनी पानिपत गाठलं. अब्दालीच्या सैन्याशी मराठा भिडले. संख्येनं कमी असलेल्या मराठ्यांची जिद्द पहाडासारखी होती. तलावारीला तलवार लागली. तोफा धडाडू लागल्या. या सर्व आवाजाला चिरत हरहर महादेवाची आरोळी आसमंत भेदत होती. मराठा सैन्य नेटाने लढत होते कारण सदाशीव भाऊ त्यांच्या सोबत आहेत, ही खात्री त्यांना होती.
अफगाणी बंदूकीच्या गोळीनं सदाशीव भाऊंच्या छातीला छेदलं. सदाशीवराव घोड्यावरुन खाली कोसळले. विश्वासरावांचा सदाशीवरावांवर जीव होता. त्यांनी कशाचीच तमा बाळगली नाही. सदाशीवरावांच्या दिशेने ते निघाले. गनिमांच्या वेढ्यात शिरले. ते परतलेच नाहीत. आणि हीच चुक नडली. संख्या कमी असताना हातावर शिर घेवून लढणाऱ्या मराठा सैन्याला ना सदाशीवराव दिसले, ना विश्वासराव. मराठ्यांचं सैन्य बिथरलं. अफगाणांनी डाव साधला. पुन्हा मागं ठेवलेल्या राखीव आणि ताज्या दमाच्या सैन्यानं परत मराठ्यांवर हल्ला केला. बेरहमीनं केलेल्या या हल्लयात मराठा सैन्याचं ‘पानिपत’ झालं होतं.
सदाशीवरराव, विश्वासराव शत्रुसैन्याशी लढत राहिले. शेवटी दोघेही धारातीर्थी पडले. युद्धाच्या तीन दिवसांनंतर विश्वासराव यांचं बिना शिराचं शरीर सापडलं त्याचा अंत्यविधी करण्यात आला. नंतर पुढच्या दिवशी त्यांचे शिर सापडले, अफगाण सैन्यानं ते लपवून ठेवलं होतं. त्याचेही दहन करण्यात आलं.
विश्वासरावांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्रात नव्या म्हणीनं जन्म घेतला. ‘विश्वास तर गेला पानिपतच्या लढाईत.’ इतिहासाचं ज्ञान नसणाऱ्या अनेक लोकांकडून ही म्हण ऐकता येणं शक्य आहे.
१७६१ च्या २० जानेवारीचा तो दिवस होता. ज्यादिवशी सदाशिव भाऊंनी त्यांचा जीव आणि मराठा साम्राजानं प्रतिष्ठा गमवली. सदाशीवरावांसाठी विश्वासराव भावूक झाले आणि अंबारीतून खाली उतरले. आणि नंतर जे घडलं तो इतिहास सर्वांना माहित आहे.
अब्दालीनं पानिपत जिंकलं पण अफगाणमध्ये झालेल्या बंडखोरीमुळं तो परतला. मराठे हारूनही जिंकले होते. मराठ्यांची हार झाली पण त्यांनी अब्दालीच्या सैन्याचा प्रचंड बिमोड केला होता. अब्दालीनं आत्मविश्वास गमावला होता. त्यामुळे त्याने दिल्लीच्या तख्तावर बसणं टाळलं. यामुळं भारताचा ताबा पुन्हा परकीय सुलतानाच्या ताब्यात जाता जाता राहीला. थोड्याच कालावधीत मराठे पुन्हा सावरले आणि उत्तरेत आपला दबदबा स्थापन केला. सुभेदार मल्हारराव होळकरांकडे उत्तर हिंदोस्थानचा संपूर्ण अधिकार पेशव्यांनी दिला. पानिपतनंतर उत्तर भारतात मराठ्यांची विस्कटलेली घडी त्यांनी सावरली.
पानितपचा पराभव जिव्हारी लागणारा असला तरी शिकवणींनी भरलेला आहे. इतिहासाचा अभ्यास याच शिकवणीतून बोध घेऊन वर्तमानात त्या चुका टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला