मनमोहन सिंगांच्या काळात पेट्रोलचा दर किती आणि आता किती? – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढत्या इंधन दरवाढीचा मुद्दा सातत्याने चर्चित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या कार्यकाळातील पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुरावा दिला. केंद्र सरकारवर तसेच भाजपावर शरसंधान साधले. ८ मार्चला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मी या विषयावर बोलणारच, असे त्यांनी विधानसभेत सुनावले.

“पेट्रोलवर केंद्र सरकारने लावलेले कर किमतीपेक्षा जास्त आहेत, असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने पूर्वीच्या सरकारसारखे दर कायम ठेवले आहेत. पेट्रोल-डिझेलचे सध्याचे आंतराष्ट्रीय बाजार प्रतिबॅरल ६३ डाॅलर असताना इतके दर वाढत आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात प्रतिबॅलर १०३ डॉलर होते. सरकारने इंधनावर जास्त कर लावले आहेत. आम्ही यात जास्तीचे कर लावलेले नाहीत. आमची टॅक्स लावायची भूमिका नाही.” असेही अजित पवार म्हणाले.

राज्यपालांनी १२ आमदारांच्या प्रस्तावावर अजूनदेखील निर्णय घेतलेला नाही. यावर अजित पवार म्हणाले, “राज्यपालांनी सामंजस्य भूमिका दाखविली तर राज्यात वातावरण चांगले राहील. संबंधित १२ लोकांनादेखील कायद्याने आणि घटनेने सभागृहात बसण्याचा अधिकार दिला आहे”.

“शरजीलप्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहेत. लोकांच्या भावना भडकविण्याचे काम कोणीही करू नये. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.” असे अजित पवार यांनी आश्वस्त केले. तसेच “एक तथाकथित पत्रकाराने व्हाट्सएपच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक सदस्य मंत्रालयाबाहेर आंदोलन करत होता, जिथे आंदोलक कमी होते.” असा टोला त्यांनी अर्णब गोस्वामी आणि आमदार राम कदम यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER