उदयनराजेंचं काय करायचं? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली पवारांची भेट

Sharad

बारामती : सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या अन्य नेतेमंडळांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादीच्या नेते मंडळांनी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांना थोपविण्यासाठीच या मंडळींनी पवारांची भेट घेतली असावी,अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी पण वाचा : उदयनराजेंसोबत कुठल्याच विषयावर बोललो नाही – शरद पवार

सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे स्पष्ट झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास सर्वच आमदार गोविंदबाग इथं उपस्थित झाले. ही सभा गोपनीय असल्याने कोणालाच या बाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्र राजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : उदयनराजे पवारांच्या भेटीला; मात्र पवारांनी दिला ‘वेट अँड वाच’ चा सल्ला!

विशेष म्हणजे, गेल्या शनिवारी पक्षाचे खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर फसवाफसवी करू नका, नाहीतर आम्हालाही कळतं, असं त्यांनी विधान केलं होतं. तर शरद पवार यांनी उदयनराजे यांचाबाबत बोलण्याचे टाळले होते. त्यांनी माझ्याकडून भेटीची वेळ मागितली आहे. साताऱ्यातील भाकरी करपली आहे या प्रश्नाला त्यांनी नाही म्हणून उत्तर दिले आणि अजून मी तव्यापर्यंत पोहचलो नाही, असं म्हणत पवारांनी उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रश्नाला बगल दिली होती.

ही बातमी पण वाचा : ‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं’;उदयनराजेंचा पवारांना इशारा

ही बातमी पण वाचा : शरद पवार धादांत खोटे बोलतायेत – प्रकाश आंबेडकर