७० वर्षात देशाने जे कमावले, ते अवघ्या ७ वर्षात मोदींनी गमावले; भाई जगताप यांची टीका

PM Narendra Modi - Bhai Jagtap

मुंबई : मोदी सरकारला (Modi Government) सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे काँग्रेसने (Congress) राज्यभरात निषेध नोंदवला आहे. मुंबईतही मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने कार्यक्रम घेतला. त्यांनी मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडले. या कार्यक्रमस्थळी पोलीस आल्याने काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) पोलिसांवर संतापले.

मुंबईत काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी अचानक कार्यक्रमात पोलीस आल्याने भाई जगताप पोलिसांवर भडकले. आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करता? तुमचे काय काम? असा सवाल जगताप यांनी केला. या कार्यक्रमातून पोलिसांना चक्क बाहेर काढण्यात आले.

७० वर्षात कमावले, ते ७ वर्षात गमावले
काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका केली. गेल्या ७० वर्षात देशाने जे कमावले, ते अवघ्या ७ वर्षात मोदींनी गमावले आहे. मोदी हे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. ७ वर्षात भाजपने देशात काहीच विकास केला नाही. उलट देश भकास केला. या ७ वर्षात त्यांनी काय प्रगती केली? असा सवाल जगताप यांनी केला. केनिया सारखा देश आपल्याला मदतीसाठी विचारतो आणि केंद्र त्यांच्यापुढे कटोरा घेऊन उभे राहते, ही लाजिरवाणीबाब आहे, अशी टीका करताच जर आम्ही कायदा मोडून आंदोलन करत असेल, तर पहिली मला अटक करा, असे ते म्हणाले. आमच्या लहान मुलांच्या लस विदेशात का पाठवल्या?, असा सवालही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button