ब्रेन टॉनिक म्हणून सुरु झालेली कंपनी नंतर जगातली सर्वात मोठी कोल्ड्रींग कंपनी बनली !

Maharashtra Today

अमेरिकतले डॉक्टर जॉन पॅम्बर्टन (John Pemberton) यांनी १८८६ सालच्या मे महिन्यात एक रसायन बनवलं. अटलांटामध्ये ते फार्मसिस्टचं काम करायचे. ते रसायन स्थानिक जोकब फार्मसीत घेऊन गेले. यात सोडापाणी मिळवण्यात आलं. तिथं उपस्थित लोकांना चवीसाठी हे रसायन देऊ केलं. सर्वांनाच हे पेय आवडलं आणि त्यात फार्मसितल्या फ्रँक रॉबीन्स यांनी या मिश्रणाला कोका- कोला (Coca-Cola)असं नावं दिलं. तेव्हापासून आजपर्यंत हे नाव जगावर आपलं एकहाती वर्चस्व टिकऊन आहे. कोका- कोलामध्ये दोनवेळा ‘सी’चा उल्लेख होतो. जाहिरात करण्यासाठी याचा चांगला वापर होईल म्हणून कोका- कोला हे नाव ठेवण्यात आलं होतं. ८ मे १८८६ ला पहिल्यांदा जोकब फार्मसेतून पहिल्यांदा कोका- कोला विकण्यात आला.

पहिल्या वर्षात दिवसभरात फक्त नऊ ग्लास विकले जायचे. आज चित्र बदललंय. जगभरात कोका- कोलाच्या दोन अरब बाटल्या रोज विकल्या जातात. पहिल्या वर्षी कोका- कोलाची फक्त ५० डॉलर इतकीच विक्री झाली होती; पण उत्पादन खर्च ५० डॉलरहून अधिक रुपये खर्च झाले होते. यामुळं सुरुवातीच्या काळात त्यांना नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं.

अमेरिकेतल सर्वाधिक लोकप्रिय पेय

अटलांटामधील व्यापारी ग्रिग्स कॅंडलर यांनी पॅम्बर्ट यांच्याकडून २३०० डॉलर्समध्ये कोका- कोला बनवण्याचा फॉर्म्यूला विकत घेतला. आता त्यांच्याकडे व्यापाराचे अधिकारही आले होते. १८८८ ला कोका- कोलाची निर्मिती करणाऱ्या पॅम्बर्ट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कॅंडलरांकडे कोका- कोलाची संपूर्ण मालकी होती. मोफत कोका- कोला पिण्याचे पास त्यांनी वाटले. त्यांची रणनिती होती की आधी लोकांपर्यंत कोका- कोला पोहचवावा. त्यांना कोका- कोलाची सवय व्हावी, मग विक्रीला सुरुवात करावी. यासाठी त्यांनी कुपनचा वापर करण्याचं ठरवलं.

ग्राहांकपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी कॅलेंडर, पोस्टर, वही, आणि बुकमार्क्सवर कोका- कोलाची जाहिरात करायला सुरुवात केली. त्यांची रणनिती सफल ठरली. कोका- कोला लोकांपर्यंत पोहचला आणि दिवसेंदिवस त्याची मागणी वाढू लागली. १८९० पर्यंत कोका- कोला अमेरिकेच्या सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक बनला होता. कॅलेंडरवरील जाहिरातीमुळं हे शक्य झालं होतं. नंतरच्या काळात कोका- कोलाचा वापर डोकेदुखी आणि थकव्यासारख्या आजारांपासून मुक्त राहण्यासाठी कोका- कोला वापरला जाऊ लागला. यानंतर मोठ्या वाद विवादांना कंपनीला सामोरं जावं लागलं. नंतरच्या काळात थकवा आणि डोकेदुखीवर कोका- कोला उपयुक्त ठरु शकते ही शक्यता नाकारण्यात आली.

युद्धामुळं झाला फायदा

कोका- कोला कंपनीन तेजीत प्रगती करायला सुरुवात केली. कंपनीनं अमेरिकेच्या बाजारात मोठं वर्चस्व निर्माण केलं होतं. सोबतच कॅनेडा, पनामा,क्यूबा, फ्रान्स, इंग्लंडसारख्या देशात कोका- कोलाचा खप वाढला. १९२३ साली रॉबर्ट वुड्रफ यांनी कँडलर यांच्याकडून कंपनी विकत घेतली. ते कंपनीचे अध्यक्ष बनले. जगात कोका- कोलाचं नाव गाजावं अशी त्यांची इच्छा होती. १९२८ च्या ऑल्मपिकमध्ये खेळाडूंनी पहिल्यांदा कोका- कोलाचं सेवन केलं. कोका- कोलाच्या जाहिरातींनी कंपनीला मोठा फायदा तर मिळऊन दिलाच पण सोबत कोका- कोला सामान्यांच्या आयुष्याचा हिस्सा बनला.

पुढं १९४१ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. अमेरिकेनेही या युद्धात सहभाग घेतला. हजारो अमेरिकन सैन्य दुसऱ्या देशात पाठवले गेले. अमेरिकन सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पाच सेंट मध्ये कोका- कोलाच्या विक्रीतून मिळणारा महसुल सैन्यावरच खर्च करणार असल्याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष ‘वड्रुफ’ यांनी केली. युद्धाच्या वेळी अनेकांनी कोका- कोलाचा आस्वाद घेतला. कोका- कोलाचं नाव देशभक्तीशी जोडलं गेलं. युद्धाच्या वेळी अमेरिकनं सैन्यांनी पाच अरब कोका- कोलाच्या बाटल्या पिल्या होत्या. युद्ध संपल्यानंतर कोका- कोलानं जगभरात विस्ताराला सुरुवात केली.

अनेक देशांनी केला होता विरोध

बदलत्या वेळेसोबत कोका- कोलानं जगभरातल्या बाजारपेठा ताब्यात घेतल्या. १९९० मध्ये कोका- कोलानं जर्मिनीच्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळवलं तर १९९३ साली भारतात पहिल्यांदा कोका- कोला विकला जाऊ लागला. कंपनीने अनेक शितपेयांची उत्पादनं बाजारात आणली. १९९७ ला अखाती देशांमध्ये कोका- कोला विकला जाऊ लागला. ४०० हून अधिक ब्रँडसोबत हात मिळवणी करून कंपनीनं त्यांचे प्रोडक्ट विकलेत. नॉर्थ कोरिया आणि क्यूबामध्ये कोका- कोलाच्या विक्राला बंदी आहे.

अनेकदा कंपनीला विरोधाचा सामनाही करावा लागलाय. १९५० मध्ये फ्रान्सच्या जनतेनं कोका- कोलाचा तीव्र विरोध केला. कोका- कोलाचे ट्रक त्यांनी रस्त्यावर पलटी केले होते. इराकवर अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर कोका- कोलाच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. या विरोधातूनही कंपनीने मार्ग काढला आज जगातली सर्वात मोठी कोल्ड्रींग उत्पादक कंपनी म्हणून तिनं नाव कमावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button