ब्रायन लारा व ख्रिस गेलने सचिनला निवृत्तीचे काय दिले होते स्पेशल गिफ्ट?

sachin Tendulkar & Chris Gayel & Brain Lara

सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती घेण्याला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. तब्बल 24 वर्षांच्या अतिशय सफल कारकिर्दीला सचिनने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पूर्णविराम दिला होता. सचिनचा निवृत्तीचा 200 वा कसोटी सामना वेस्ट इंडिज विरुध्दच होता.

आता या निवृत्तीच्या सात वर्षानंतर सचिन तेंडूलकरने व्टिटरवर एक स्पेशल व्हिडीओद्वारे त्याला मिळालेले स्पेशल गिफ्ट शेअर केले आहे. हे गिफ्ट त्याला विंडीजचे महान फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) व ख्रिस गेल (Chris Gayle) यांनी दिले होते.

काय होते हे गिफ्ट तर एक सुंदर ड्रम होता स्टीलचा ज्याच्यातून अतिशय ठेकेबाज संगीत निर्माण होते. याबद्दल सचिन म्हणतो की सात वर्षांपूर्वी लारा व गेलने मला हे स्पेशल गिफ्ट दिले होते. त्यांनी दिलेल्या प्रेम व सन्मानासाठी मी आभारी आहे. माझ्याप्रती तुम्हाला असलेल्या प्रेम व आदराचे हे प्रतिक आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

सचिनने या दोघांसोबत वेस्टइंडिजच्या पूर्ण संघाप्रतीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. कॕरेबियन्स माझ्यावर किती प्रेम करतात हे यातून दिसुन येते असे मास्टर ब्लास्टरने म्हटले आहे.

याचवेळी लाराने त्याच्या घराला दिलेल्या भेटीच्या आठवणीही सचिनने जागवल्या आहेत. त्या भेटीवेळी लाराने सचिनला तो ड्रम वाजवूनसुध्दा दाखवला होता. लाराने जेंव्हा तो वाजवला तेंव्हा अप्रतिम संगीत निर्माण झाले होते. मी तसे करु शकतो का बघू या, त्याच्यासारखे मला जमणार नाही हे मला माहित आहे पण त्यांच्या सर्वांच्या सन्मानात मी हा ड्रम वाजवून पाहतो असे म्हणत सचिनने त्या व्हिडीओत तो ड्रम वाजवूनही दाखवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER