मी करते ते राजकारण? मग, प्रियंका चोप्रा आणि दिलजित दोसांझ करतात ते काय? – कंगना

Priyanka Chopra-Kangana Ranaut-Diljit

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut)  आणि प्रियंका चोप्रा आणि दिलजित  दोसांझ यांच्यातला वाद काही अजून थांबला नाही. कंगना ट्विटमधून राजकारण करते, असा आरोप झाल्यानंतर तिने प्रश्न विचारला आहे – मी करते ते राजकारण? मग, प्रियंका चोप्रा आणि दिलजित दोसांझ करतात ते काय? कंगना आणि दिलजित यांच्या  वादात शेतकऱ्यांचे आंदोलन हा विषयही होता. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनावर कंगनाने टीका केली. याआधी ट्विटरवर अनेक बॉलिवूड कलाकारांवरही टीका केली. यावेळीदेखील तिने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत गायक दिलजित दोसांझ आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यावर टीका केली. मला जीवे मारण्याची धमकीदेखील येत असल्याची माहिती तिने दिली (Kangana Ranaut slams Diljit Dosanjh and Priyanka Chopra). कंगना म्हणाली, “नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला वचन दिले होते की, जेव्हा शेतकरी आंदोलनाचा भांडाफोड होईल, जसा शाहीनबाग आंदोलनाचा झाला होता, तेव्हा मी तुमच्याशी बोलेल.

गेल्या १० ते १२ दिवसांत मला फिजिकल, मेंटल आणि ऑनलाईन लिंचिंगला तोंड द्यावे लागले. मला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे देशाला प्रश्न विचारावा हा माझा हक्क आहे. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याच शंकेला जागा सोडलेली नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलन हे राजकीय उद्देशानेच सुरू आहे. या आंदोलनात अतिरेकीदेखील सहभागी होऊ लागले आहेत. मी पंजाबमध्ये लहानाची मोठी झाले. पंजाबच्या ९९ टक्के नागरिकांना खलिस्तान नको आहे. त्यांना देशाचा फक्त एक तुकडा नको आहे; त्यांना पूर्ण देश हवा आहे.

हिमाचलप्रदेश, अरुणाचलप्रदेश, महाराष्ट्र सर्व त्यांचे आहे. ते सर्वच देशप्रेमी आहेत, असा दावा कंगनाने केला. ती म्हणाली, माझी अतिरेक्यांबाबत तक्रार नाही, ज्यांना देश तोडायचा आहे. मी निष्पाप लोकांना विचारते, ते या लोकांमध्ये का वाहवत जातात. शाहीनबागची आजी जी वाचू-लिहू शकत नाही ती आपल्या नागरिकतेसाठी आंदोलन करते! पंजाबची एक आजी मला घाणेरड्या शिव्या देते. काय सुरू आहे या देशात? मित्रांनो, आपण स्वत:ला या अतिरेकी आणि विदेशी शक्तींच्या स्वाधीन का करतो आहे ? माझी तक्रार तुमच्याबाबत आहे.

मला दररोज माझा हेतू सांगावा लागतो. दोसांझ आणि प्रियंका चोप्रा यांच्यावर टीका करताना कंगना म्हणाली, दिलजित दोसांझ आणि प्रियंका चोप्रा यासारखे लोक काय करत आहेत? मी देशाच्या बाजूने बोलते तर मी राजनीती करते असे म्हणतात. मग यांनाही विचारा, ते काय करत आहेत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER