जेवणानंतर काय करू नये – आयुर्वेदविचार !

Meal - Maharastra Today

आहाराचे पाचन चांगले होणे हे शरीर पोषण होण्याकरीता तसेच रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सप्तधातुचे पोषण होण्याकरीता खूप आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही वेळेस जेवण चांगले असणे व जेवणानंतर आहारपचनाला अडथळा निर्माण न होण्याकरीता काही काळजी घेणे आवश्यक आहे.

 1. जेवणानंतर पाणी पिणे – जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे लठ्ठपणा येतो. आमाशयाच्यावरील प्रदेशात म्हणजेच उरःभागी कफाची वृद्धी होते.
 2. जेवणानंतर उसाचा रस पिणे. उसाचा रस पचायला जड, थंड, गोड असतो. त्यामुळे पाचन मंदावते.
 3. जेवणा झाल्यानंतर लगेच सातूचे पीठ खाऊ नये.
 4. जेवणानंतर वाहन चालविणे, सवारी करणे हे करू नये.
 5. अग्नीजवळ किंवा उन्हात बसू नये.
 6. जेवणानंतर व्यायाम मालीश उटणे या क्रिया करू नये.
 7. जेवणानंतर स्नान करू नये.
 8. जेवणानंतर झोपू नये. जेवणानंतर मैथून कर्म करू नये.
 9. जेवणानंतर लगेच फळं खाऊ नये.
 10. भोजनानंतर पोहे, तांदळच्या पिठाचे पदार्थ खाऊ नये.
 11. धूम्रपान, मद्यपान, चहापान करु नये.
 12. जेवणानंतर पुन्हा जेवण करणे.
 13. जेवणाचे शेवटी गोड पदार्थ खाणे.

या सर्वच गोष्टी आहाराचे पचन व्यवस्थित होऊ देत नाही. परीणामी आहार रस योग्यप्रकारे बनण्यास अडथळा येऊन शरीरात नानाविध विकार, पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. जेवण झाल्यानंतर वरील नियम नक्की ध्यानात ठेवावे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button